पुणे

हिर्डोशी शाळेस साहित्य भेट

CD

भोर, ता. ९ ः हिर्डोशी (ता. भोर) येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेस तीन उद्योजकांकडून संगणक, सीसीटीव्ही, वॉटर फिल्टर, खेळाचे साहित्य आणि पुस्तके भेट देण्यात आली.
पुण्यातील उद्योजक किरण गुजर, सुभाष शिर्के आणि संजीव ओक यांनी शुक्रवारी (ता. ९) दुपारी हिर्डोशीच्या शाळेच्या मुख्याध्यापिका वैशाली वाबळे यांच्याकडे या भेटवस्तू सुपूर्त केल्या. येथील शाळा ही दुर्गम भागात असल्यामुळे विद्यार्थ्यांसाठी सोयीसुविधांची अभाव आहे. त्यामुळे शिक्षक आणि शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप धामुणसे यांनी उद्योजकांकडे विद्यार्थ्यांसाठी सोयी निर्माण करण्याची विनंती केली होती. त्यास प्रतिसाद देत किरण गुजर, सुभाष शिर्के आणि संजीव ओक यांनी विद्यार्थ्यांना आवश्यक असलेल्या वस्तू भेट दिल्या.
यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिलीप धामुणसे, उपाध्यक्ष मीना धामुणसे, अंकुश धामुणसे, चाकण (ता. खेड) येथील वनपरिक्षेत्र अधिकारी संतोष कंक, पंचायत समितीचे माजी उपसभापती सुनील भेलके, धोंडिबा मालुसरे, कोंडिबा धामुणसे, हनुमंत धामुणसे, लक्ष्मण धामुणसे यांच्यासह ग्रामपंचायतीचे पदाधिकारी पालक व शिक्षक उपस्थित होते.
विद्यार्थ्यांचे आरोग्य चांगले राहावे, यासाठी वॉटर फिल्टर आणि शाळेच्या सुरक्षिततेसाठी सीसीटीव्ही दिले असून, विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढविण्यासाठी संगणक आणि पुस्तके दिली असल्याचे किरण गुजर यांनी सांगितले. दानशूर व्यक्तींनी दिलेल्या शैक्षणिक साहित्यामुळे विद्यार्थ्यांची गुणवत्ता सुधारणार असल्याचे मुख्याध्यापिका वैशाली वाबळे यांनी सांगितले.

06297

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Central Railway: रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची सूचना! आठवड्याच्या मध्यातच मुंबई लोकलवर पॉवर ब्लॉक; कधी आणि कुठे? वाचा...

स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच गावात आली महामंडळाची बस; गावकऱ्यांनी वाजत-गाजत केलं स्वागत...

Latest Marathi News Update : राज्यासह देशभरात दिवसभरात काय काय घडलं? वाचा एका क्लिकवर...

Aadul News : कर्जबाजारीपणाला कंटाळून तरुण शेतकऱ्याने संपविले जीवन; पैठण तालुक्यातील एकतुनी येथील घटना

नेटीझन्स भडकल्यावर नोराचं ते अश्लील गाण्याचं हिंदी व्हर्जन तात्काळ हटवलं पण इतर भाषांमध्ये जैसे थे !

SCROLL FOR NEXT