पुणे

जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात क्रीडा महोत्सव साजरा

CD

भोर, ता. १७ : येथील राजगड ज्ञानपीठाच्या जिजामाता प्राथमिक विद्यामंदिरात राजगड ज्ञानपीठ संस्थेचे संस्थापक अनंतराव थोपटे यांच्या वाढदिवसानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले होते. या क्रीडा महोत्सवाचे नुकतेच उद्‍घाटन झाले. यावेळी संस्थाचालक संघटनेचे उपाध्यक्ष डॉ. प्रसन्नकुमार देशमुख, शिवछत्रपती अवॉर्ड प्राप्त नॅशनल ज्यूदो कोच योगेश काशिनाथ धाडवे पाटील, प्रा. विजय जाधव, नॅशनल ज्यूदो प्लेयर ईशान धाडवे आदी उपस्थित होते.
क्रीडा ज्योत पेटविल्यानंतर इयत्ता पहिली व दुसरीच्या विद्यार्थ्यांनी चक दे इंडिया ब्राझील या गाण्यावर नृत्य सादर करून उपस्थित यांची मने जिंकली. क्रीडा स्पर्धांची सुरुवात कुस्तीच्या स्पर्धेने करण्यात आली. तालुक्यात प्रथम गोळा फेक स्वारगेट प्रथम क्रमांक मिळवलेली तन्वी भेलके आणि कुस्तीमध्ये तालुक्यात प्रथम क्रमांक मिळविलेला योगेश किंद्रे यांचा सत्कार करण्यात आला.
‘‘यश असो वा अपयश हे समजून घेऊन जीवन नीट जगणे या गोष्टी आपल्याला खेळ किंवा क्रीडा शिकवते,’’ असे मत योगेश धाडवे पाटील यांनी व्यक्त केले. क्रीडा महोत्सवात खो-खो, कबड्डी, लंगडी, रस्सीखेच हे सांघिक खेळ आणि बेडूक उड्या मारणे, चमचा लिंबू, धावणे, दोरीच्या उड्या, तीन पायाची शर्यत या वैयक्तिक स्पर्धा घेण्यात आल्या. याशिवाय रिले मॉडेल, चित्र पूर्ण करणे, संगीत खुर्ची, बटाटा शर्यत, फुगा फोडणे, बाटली पाणी भरणे, बॉल पास करणे, असे मनोरंजनात्मक खेळही घेण्यात आले.
मुख्याध्यापिका कविता वीर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्या दामगुडे, विजय खोपडे, स्मिता घोणे, भारती किंद्रे, पल्लवी सागळे, शंकर धोंडे, अनिता तांबे, ऋता वालगुडे, स्मिता शिनगारे, किरण जाधव, चैताली कोंढाळकर, मनीषा शिर्के या शिक्षकांनी महोत्सवाचे नियोजन केले.
विजय खोपडे यांनी सूत्रसंचालन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai port oil tanker arrival: होर्मुझचा धोकादायक मार्ग पार करत पहिले तेलवाहू जहाज मुंबई बंदरात दाखल! व्हिडिओ पाहा...

Maharashtra Heatwave : विदर्भात उष्णतेची लाट ! अमरावतीत देशातील सर्वाधिक तापमान, मात्र राज्यातील 'या' जिल्ह्यांत अवकाळीचा इशारा

Solapur Water Crisis: सोलापूर शहरात आता चार अन् पाच दिवसांआड पाणी; तीन दिवसांआडची पद्धत बंद, जलवाहिनी नसलेल्या ठिकाणी टँकरने पुरवठा!

Nanded News: नांदेडमध्ये गॅस एजन्सीसमोर पहाटेपासून रांगा; घरगुती सिलिंडरवर व्यावसायिकांची नजर; घरगुती गॅसचा व्यावसायिक वापर वाढला

Latest Marathi News Live Update : नागपुरात कळमेश्वर MIDC मध्ये एशियन केमिकल्सवर कृषी विभागाचा छापा

SCROLL FOR NEXT