पुणे

भोर तालुक्यात चार अर्ज दाखल

CD

भोर, ता. १९ : जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या चौथ्या दिवशी भोर तालुक्यात सोमवारी (ता. १९) जिल्हा परिषदेसाठी आणि पंचायत समितीसाठी प्रत्येकी दोन, अशा एकूण केवळ चार उमेदवारांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले. शुक्रवारी (ता. १६) उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली असली तरीही शुक्रवारी आणि शनिवारी एकही उमेदवारी अर्ज दाखल झाला नाही. सोमवारी प्रथमच चार अर्ज दाखल झाले. मात्र, सोमवारपर्यंत १२६ इच्छुक उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. यामध्ये जिल्हा परिषदेसाठी ५३ इच्छुक उमेदवारांच्या ९४ अर्जांचा आणि पंचायत समितीसाठी ७३ उमेदवारांच्या १२२ अर्जांचा समावेश आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी तथा प्रांताधिकारी डॉ. विकास खरात आणि साहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार राजेंद्र नजन यांनी दिली.
सोमवारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या तीन आणि एका अपक्ष उमेदवारांनी अर्ज दाखल केला आहे. जिल्हा परिषदेसाठी भोंगवली- कामथडी गटासाठी सर्वाधिक २८ अर्ज आणि पंचायत समितीच्या भोलावडे गणासाठी सर्वाधिक २३ उमेदवारांनी अर्ज नेले आहेत. अर्ज घेऊन गेलेल्या उमेदवारांची संख्या पुढीलप्रमाणे : गट : वेळू- नसरापूर (२७), भोंगवली- कामथडी (२८), शिंद- भोलावडे (२०), कारी- उत्रौली (१९). गण : वेळू (१३), नसरापूर (१८), भोंगवली (१८), कामथडी (१९), भोलावडे (२३), शिंद (१३), उत्रौली (१४), कारी (४).

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2026 Update: अजिंक्य रहाणेने सोडले KKR चे कर्णधारपद? व्हायरल पोस्टने उडवली खळबळ, त्यात लिहिलंय...

Ketu Nakshatra Gochar: केतू मघा नक्षत्र परिवर्तनात करेल प्रवेश , जाणून घ्या कोणत्या राशींच्या वाढणार समस्या

Latest Marathi News Live Update : आखाती देशांमधील युद्धाची झळ थेट बळीराजाच्या खिशाला

BAMU Recruitment: मराठवाडा विद्यापीठात ७८ पदांसाठी तब्बल ६,९१४ अर्ज; हार्डकॉपीसाठी १८ मार्चपर्यंत मुदत

ISrael-Iran War : इराणचा तेल जहाजावर हल्ला, मुंबईच्या इंजिनिअरचा मृत्यू; समुद्रात उड्या मारल्याने २७ जण बचावले

SCROLL FOR NEXT