पुणे

भोर विभाग सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील पवार

CD

भोर, ता. २२ : येथील भोर विभाग सेवा सोसायटीच्या अध्यक्षपदी सुनील सदाशिव पवार; तर उपाध्यक्षपदी शिवाजी नारायण शेडगे यांची बिनविरोध निवड झाली.
या सोसायटीचे अध्यक्ष चंद्रकांत बांदल व उपाध्यक्ष सुरेश धोत्रे यांनी राजीनामा दिल्यामुळे रिक्त झालेल्या पदांच्या निवडीसाठी
भोरमधील सहाय्यक निबंध सहकारी संस्था यांच्या कार्यालयात सोमवारी (ता. १९) या निवडी करण्यात आल्या. संजय पवार यांनी निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून; तर सचिव महेंद्र तावरे यांनी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहिले. यावेळी सोसायटीचे सर्व संचालक उपस्थित होते. निवडीनंतर सुनील पवार व शिवाजी शेडगे यांचा माजी आमदार संग्राम थोपटे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी राजगड साखर कारखान्याचे उपाध्यक्ष पोपट सुके, संचालक उत्तम थोपटे, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष जीवन कोंडे, भोर तालुकाध्यक्ष संतोष धावले, पोपटराव मालुसरे, शिवाजीराव थोपटे, भाऊसाहेब बांदल, अंकुशराव चौधरी, अंकुशराव बरदाडे, बाजीराव नांगरे, सोहम पवार, श्रीरंग शेटे, शामराव जेधे, गणेश गायकवाड, धोंडिबा उभे, मंगेश गोळे आदी उपस्थित होते.
भोर शहर, पिसावरे, खानापूर, भाबवडी आणि गोकवडी या पाच गावांचे कार्यक्षेत्र असलेल्या भोर विभाग सेवा सोसायटीमध्ये १३ संचालक आणि १ हजार ४६५ सभासद आहेत. संग्राम थोपटे यांच्या मार्गदर्शनाखाली व संचालकांच्या सहकार्याने शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सुनील पवार यांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Property Tax: पुणे महानगरपालिकेत भाजपने करमाफीचा शब्द फिरवला; ५०० चौरस फुटांपर्यंतच्या घरांना टॅक्स माफी नाही

Gas Cylinder Shortage : छत्रपती संभाजीनगर तालुक्यात ग्रामीण भागात गॅस टंचाई; लग्नसमारंभ व हॉटेल व्यवसाय अडचणीत, अनेक हाँटेल गॅसअभावी बंद

Latest Marathi News Live Update: श्रीनगरच्या मालपोरा भागात दोन निवासी घरांना आग लागली

Theur Fraud News : लँड डेव्हलपरला मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून १२ कोटींचा घातला गंडा

Pachod News : केकत जळगाव येथे कर्जबाजारीपणाला कंटाळून शेतकऱ्याने संपविले जीवन

SCROLL FOR NEXT