पुणे

अडीच तोळे सोन्याच्या बदल्यात नकली बिस्कीट

CD

भोर, ता. २३ : मंगळवारी (ता. २०) आठवडे बाजाराच्या दिवशी दोन अनोळखी व्यक्तींनी सोन्याचे बिस्कीट देण्याचे आमिष दाखवून ज्येष्ठ महिलेच्या गळ्यातील अडीच तोळ्यांची माळ लांबविली. दुपारी पावणेतीन वाजण्याच्या सुमारास कुंभार टेकडी गणेशमंदिराच्या जवळ ही घटना घडली. अलका वसंत म्हस्के (वय ६५, रा. पळसोशी, ता. भोर) या ज्येष्ठ महिलेची फसवणूक होऊन त्यांचे २ लाख १० हजारांचे नुकसान झाले आहे.
म्हस्के या बाजारात जाताना त्यांना दोन व्यक्ती भेटल्या. त्यांनी त्यांच्याशी बोलण्यास सुरुवात केली. त्यापैकी एकाने माझ्याकडे १२ तोळे सोन्याचे बिस्कीट असल्याचे सांगत दुसऱ्याला त्याच्या हातातील सोन्याचे कडे आणि अंगठी देण्यास सांगितली. मस्के यांच्यासमोर त्यांनी एकमेकांकडील सोन्याचे कडे, अंगठी आणि सोन्याच्या बिस्किटांची देवाण-घेवाण करण्याची बोलणी केली. त्यानंतर एकाने माझ्याकडे आणखी एक बिस्कीट आहे, आजी तुम्हाला पाहिजे असल्यास सांगा. असे सांगून आजीचा विश्‍वास संपादन केला. त्यांनी म्हस्के यांना सम्राट चौकातील गणपती मंदिराच्या मागच्या बाजूला नेले. तेथे आपल्या गळ्यातील ४ मोठे मणी आणि १६० लहान सोन्याचे मणी असलेले अडीच तोळे वजनाची माळ त्यांना काढून दिली. त्या बदल्यात त्यांना १२ तोळे सोन्याचे नकली बिस्कीट दिले. घरी गेल्यावर त्यांनी नातेवाइकांना सांगितल्यावर त्यांना आपली नकली सोन्याचे बिस्कीट देवून फसवणूक केल्याचे लक्षात आले. गुरुवारी (ता. २२) दुपारी त्यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली. पोलिसांनी दोन अनोळखी व्यक्तींवर गुन्हा दाखल केला आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Mumbai Local: महिला प्रवाशांसाठी मोठी बातमी! मुंबई लोकलमध्ये ‘पिंक कोच’ सुरू होणार; सुरक्षित प्रवासासाठी नवा उपक्रम

Beed Crime: परळीत अल्पवयीन मुलीवर पाशवी अत्याचार; दोन नराधमांविरुद्ध पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल

Gas Cylinder Issue : ना आंघोळ, ना जेवण, गॅस साठी वणवण; गॅस सिलिंडरसाठी ग्राहकांनी गाठले पोलीस ठाणे

Latest Marathi News Live Update : कुस्ती महासंघाच्या विरोधात ISWAI ची पुणे कोर्टात धाव

महाराष्ट्रासाठी मोठी बातमी! मुंबई-पुणे एक्सप्रेसवे मिसिंग लिंक पूर्ण; पहिला ड्रोन व्हिडिओ आला समोर, उद्घाटनाची तारीख काय?

SCROLL FOR NEXT