भोर, ता. ३० ः येथील भोर हेल्थ अॅंड सोशल फाउंडेशनच्या वतीने दिवंगत शुभांगद गोरेगावकर यांच्या १८व्या स्मृतीदिनानिमित्त सोमवारपासून (ता. १) सेवा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे. १ फेब्रुवारी ते ७ फेब्रुवारी या सेवा सप्ताहात विविध समाजोपयोगी कार्यक्रम घेण्यात येणार आहेत, अशी माहिती फाउंडेशनचे संस्थापक डॉ. सुरेश गोरेगावकर यांनी दिली. सोमवारी सकाळी येथील राजा रघुनाथराव विद्यालयास दिलेला जलशुद्धीकरण प्रकल्प (आरओ प्लांट) प्रदान करून या सेवा सप्ताहाची सुरुवात करण्यात येणार आहे.
कझाकस्तानमधील भारताचे राजदूत डॉ. देवेंद्र साळी हे या कार्यक्रमासाठी उपस्थित राहणार आहेत. याशिवाय सप्ताहात पै खाशाबा जाधव स्पोर्ट अॅकॅडमीला साहित्याचे वाटप, आपटी माध्यमिक विद्यालयास वॉटर प्युरिफायर, मूक-बधीर विद्यालयातील विद्यार्थ्यांना क्रीडा साहित्याचे वाटप, वनवासी कल्याण आश्रमातील विद्यार्थ्यांसाठी धान्य वाटप, अण्णासाहेब नांदूरकर वृद्धाश्रमातील ज्येष्ठांची आरोग्य तपासणी, बारे येथील शाळेतील व विद्यालयातील विद्यार्थ्यांची नेत्र तपासणी, रथखाना प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांची दंत तपासणी आदी उपक्रम घेण्यात येणार आहेत. शनिवारी (ता. ७) शहरातील रथखाना येथे होणाऱ्या सेवा सप्ताहाच्या मुख्य कार्यक्रमात भोरमधील ज्येष्ठ समाजसेवक सुरेशभाई शाह यांना इंडियन मेडीकल असोसिएशनचे महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष डॉ अविनाश भोंडवे यांच्या हस्ते शुभांगद जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. या कार्यक्रमास दूरदर्शन व आकाशवाणीच्या निवेदिका व मुलाखतकार अनघा देढे या प्रमुख पाहुण्या म्हणून उपस्थित राहणार आहेत. याशिवाय प्रज्ञा गौरव पुरस्कार, कार्य गौरव पुरस्कार व निवृत्त सैनिक पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.