भोर, ता. ५ : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुकीच्या मतदानासाठी तालुक्यातील २३७ मतदान केंद्र सज्ज झाली असून, तालुक्यातील १ लाख ५४ हजार ८१० मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत, अशी माहिती भोरचे निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. विकास खरात आणि सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र नजन यांनी दिली. मतदान प्रक्रिया शांततेत आणि यशस्वीपणे राबविण्यासाठी प्रशासनाने कंबर कसली आहे. येथील येसाजी कंक औद्योगिक प्रशिक्षण संस्थेमधून शुक्रवारी (ता. ६) सकाळी आठ वाजता निवडणुकीचे साहित्य आणि कर्मचारी मतदान केंद्रांवर पाठविण्यास सुरुवात केली जाणार आहे.
तालुक्यातील ७८ हजार ३५२ पुरुष मतदार आणि ७६ हजार ४५७ महिला मतदारांशिवाय एक तृतीयपंथी १ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी १ हजार ६५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली आहे. मतदान यंत्रे इतर साहित्य आणि कर्मचारी यांना मतदान केंद्रावर पोहोचविण्यासाठी एसटीच्या ३८ गाड्या, ८ खासगी बस आणि ३० जीप आदी वाहने तयार ठेवली आहेत. शुक्रवारी दुपारपर्यंत प्रत्येक मतदान केंद्रांवर सर्व साहित्य आणि कर्मचारी वेळेत पोहोचतील, अशी व्यवस्था केलेली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.