भोर, ता.१२ : कापूरव्होळ-भोर-मांढरदेवी मार्गाच्या काम सुरू असल्यामुळे शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन गुरुवारी (ता.१२) सायंकाळी फुटली. त्यामुळे रस्त्याला ओढ्याचे स्वरूप आले आणि वाहन चालकांसह पादचाऱ्यांची तारांबळ उडाली. पाणी जाऊन काही प्रवाशांच्या दुचाकी (मोपेड) बंद पडल्या.
शहरातील चौपाटी परिसरातील विद्यानगर भागात मांढरदेवीला जाणाऱ्या मार्गावरील पाण्याची वितरण लाइन जेसीबीच्या खोदाईमुळे गुरुवारी सायंकाळी चारच्या सुमारास फुटली. त्यामुळे हजारो लिटर पाणी वाया गेले. घटनेची माहिती मिळताच नगरपालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने पाणीपुरवठा बंद केला. परंतु तोपर्यंत रस्त्यावर हजारो लिटर पाणी आले. सार्वजनिक बांधकाम विभागाचे शाखा अभियंता प्रकाश जाधववर यांनी घटनास्थळी जाऊन संबंधित ठेकेदाराच्या व्यक्तींना बोलावून घेतले. आणि पाइपलाइन दुरुस्तीचे काम सुरू केले. सायंकाळी उशिरापर्यंत हे काम सुरू होते. पाइपलाइनचे काम पूर्ण झाले तर शुक्रवारी (ता.१३) शहराचा पाणीपुरवठा सुरळीत होईल; अन्यथा काही भागातील पाणीपुरवठा बंद राहणार असल्याचे नगर पालिकेच्या पाणीपुरवठा विभागाकडून सांगण्यात आले.
पाणीपुरवठ्याची पाइपलाइन ३६ वेळा फुटली
कापूरव्होळ - भोर- मांढरदेवी मार्गाच्या काँक्रिटीकरणाचे काम सुरू झाल्यापासून भोर शहराला पाणीपुरवठा करणारी पाइपलाइन आजपर्यंत ३६ वेळा फुटली आहे. यामुळे भोरचा पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे.
6444
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.