भोर, ता. १४ : भोर-मांढरदेवी मार्गावरील भोर शहराजवळ असलेल्या भाबवडी (ता. भोर) येथे बंद घराचे कुलूप तोडून चोरट्यांनी सोन्या- चांदीच्या दागिन्यांसह ५० हजारांची रोकड चोरून नेली.
भाबवडीमधील शेतकरी जनार्दन विठ्ठल शिवतरे (वय ३७) यांच्या घरात शुक्रवारी (ता. १३) ही चोरी झाली. जनार्दन शिवतरे यांचे ११ हजार ३०० रुपयांचे सोन्याचे दागिने आणि ५० हजार रुपयांची रोकड चोरून नेली.
भोर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जनार्दन शिवतरे यांनी भोर पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली. शुक्रवारी सकाळी घरातील सर्वजण शेतात गेले. साडेअकरा वाजता शेतातून आल्यानंतर त्यांना घराचे कुलूप तुटलेले दिसले. घरातील पन्नास हजारांची रोख रक्कम असलेली पत्र्याची पेटी चोरट्यांनी घरा पाठीमागे नेऊन त्यातील रक्कम चोरून नेली. आणि घरातील अकरा हजार तीनशे रुपयांचे सोन्या-चांदीचे दागिने नेले. पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरोधात गुन्हा दाखल केला असून पोलिस हवालदार यशवंत शिंदे पुढील तपास करत आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.