भोर, ता. १५ : महाराष्ट्र साहित्य परिषद भोर शाखेच्या वतीने मसापच्या तपपूर्ती वर्षानिमित्त घेण्यात आलेल्या राज्यस्तरीय ग्रामीण बोलीभाषा कथा स्पर्धेत वाई (जि. सातारा) येथील सुरेश शिंगटे यांच्या ‘बसाप्पा सिद्धाप्पा’ कथेस प्रथम क्रमांकाचा साहित्यिक शंकर पाटील पुरस्कार देण्यात आला. मोहिनी लिमये (बेलापूर) यांच्या ‘सोडूनी दिवापाची इच्छा’ या कथेस द्वितीय क्रमांकाचा , सदानंद पुंडकाळ (कोल्हापूर) यांच्या ‘पावणशेर’ कथेस तृतीय, कमलाकर हणवंते (चंद्रपूर) यांच्या ‘इस्वास’ कथेला चतुर्थ तर अविनाश भोंडवे (पुणे) यांच्या ‘असला ह्यो म्हाद्या’ कथेस पाचव्या क्रमांकाचा पुरस्कार देण्यात आला.
येथील श्रीमंत सौ. गंगूताई पंतसचिव वाचनालयाच्या सभागृहात शनिवारी (ता. १४) झालेल्या या कार्यक्रमात राज्य मराठी विश्कोश निर्मिती मंडळाचे माजी अध्यक्ष राजा दीक्षित व मसापचे जिल्हा प्रतिनिधी रावसाहेब पवार यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. सन्मानचिन्ह, सन्मानपत्र यांसह रोख रक्कम असे या पुरस्कारांचे स्वरुप आहे. याशिवाय उत्तम कथा असलेल्या २० लेखकांना या प्रसंगी सन्मानपत्र देण्यात आले. या वेळी मसापच्या भोर शाखेचे अध्यक्ष डॉ. प्रदीप पाटील, उपाध्यक्ष सुरेश शेटे, कार्याध्यक्ष डॉ. अरुण बुरांडे, कार्यवाह गिरीश भूतकर, डॉ. संगीता खोकले, डॉ. विजया पाटील, प्रा. धनंजय लंबाते, भोरच्या उपनगराध्यक्षा ॲड. जयश्री शिंदे, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, भोर एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष प्रमोद गुजर, सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, नगरसवेक अमित सागळे आदी उपस्थित होते.
मसापच्या तपपूर्ती वर्षानिमित्त भोर शाखेच्या वतीने जानेवारी महिन्यात या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. राज्यासह बडोदा, कोची व अमेरिकेसारख्या देशात स्थायिक झालेल्या महाराष्ट्रीयन लेखकांनी स्पर्धेसाठी १४२ कथा पाठविल्या. यामध्ये कोकणी, कोल्हापूरी, मालवणी, सातारी, पुणेरी, आदिवासी, सोलापुरी व खानदेशी या प्रमुख बोलीभाषांमधील कथांचा समावेश असल्याचे गिरीश भूतकर यांनी सांगितले. प्रा. बी. डी. गायकवाड, स्वाती दुधगावकर-शेष, डॉ. संदीप उल्हाळकर, संतोष ढवळे व एम. एम. भारांबे यांनी स्पर्धेचे परीक्षण केले. या कार्यक्रमात धनश्री तळवळकर यांनी लिहिलेल्या ‘उरले उरात काही’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. डॉ. अरूण बुरांडे यांनी कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. डॉ. संगीता खोकले यांनी सूत्रसंचालन केले तर, धनंजय लंबाते यांनी आभार मानले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.