भोर, ता. १५ : महाशिवरात्रीनिमित्त येथील संस्थानकालीन भोरेश्वर मंदिरात दर्शनासाठी भाविकांच्या दिवसभर लांबलचक रांगा लागल्या होत्या. भोरवासीयांसमवेत ग्रामीण भागातील सुमारे १५ हजार भाविकांनी भोरेश्वराचे दर्शन घेतले. मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई, शंभू महादेवाच्या पिंडीवर आणि गाभाऱ्यात फुलांची केलेली आकर्षक सजावट आणि मंदिर परिसरात काढलेल्या अनोख्या रांगोळ्यांनी भाविकांच्या आनंदात भर पडली.
भोरेश्वर देवस्थान ट्रस्टच्या वतीने महाशिवरात्रीनिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. यामध्ये अभिषेक, महापूजा, आरती, भजन आणि प्रवचन आदींचा समावेश आहे. ट्रस्टचे अध्यक्ष डॉ. उदय जोशी, गोपीनाथ आगाशे, विनायक सणस, ज्ञानेश्वर मचाले, श्रद्धा भातलवंडे, रवींद्र कोंढाळकर, यशवंत डाळ, राजकुमार शिंदे यांनी या कार्यक्रमांचे नियोजन केले. रविवारी पहाटे पाच वाजता अभिषेक झाल्यानंतर मंदिर भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले.
विद्युत रोषणाई, रांगोळी, फुलांची सजावट आणि महाप्रसाद यासाठी गणेश हर्णसकर, संतोष किंद्रे, ओम आहिर, अमित शेलार, यश गायकवाड, प्रमोद खंदारे, गौतम ओसवाल, अभिजित साठे, ॲड. जयश्री शिंदे, कुणाल धुमाळ, अतुल काकडे आदींनी विशेष प्रयत्न केले. सायंकाळी सात वाजता चंद्रकांत महाराज उदावंत यांचे प्रवचन झाले.
6458
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.