पुणे

भोरमध्ये रंगले विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन

CD

भोर, ता. १८ : येथील भोर एज्युकेशन सोसायटीच्या निवासी मूकबधिर पूर्व प्राथमिक व प्राथमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांनी वार्षिक स्नेहसंमेलनात विविध कलाविष्कार सादर केले. हे कलाविष्कार पाहून उपस्थित मान्यवरांसह भोरवासीय भारावले होते.
निवासी मूकबधिर विद्यालयातील विद्यार्थ्यांचे दोन दिवसांचे संयुक्त वार्षिक स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. स्नेहसंमेलनाच्या पहिल्या दिवसाच्या विविध गुणदर्शन कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी २४ गाण्यांवर कलाविष्कार सादर केले.
दुसऱ्या दिवशी वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ संपन्न झाला. कार्यक्रमाच्या सुरुवातीस विविध गुणदर्शन कार्यक्रमातील निवडक कलाकृती सादर करण्यात आल्या. कार्यक्रमाच्या उद्‍घाटनप्रसंगी पुण्यातील औद्योगिक औषधशास्त्र सल्लागार मोहन मोने, उद्योजक व गुंतवणूक सल्लागार मंदार ओक व राष्ट्रीय बुद्धिबळ खेळाडू प्रकाश देशपांडे उपस्थित होते.
भोर एज्युकेशन सोसायटीचे संचालक दत्तात्रेय मोरे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यक्रमास संस्थेचे अध्यक्ष प्रमोद गुजर, सचिव डॉ. सुरेश गोरेगावकर, उपाध्यक्ष मधुकर पैठणकर, महादेव मळेकर, स्कूल कमिटीचे अध्यक्ष डॉ. आण्णासाहेब बिराजदार आदी उपस्थित होते. यावेळी मान्यवरांच्या हस्ते वर्षभरात झालेल्या विविध स्पर्धांमधील विजेत्या विद्यार्थ्यांना पारितोषिके देण्यात आली. प्राथमिक शाळेच्या कार्याध्यक्षा ज्योती वाघमारे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. प्रमुख पाहुणे मंदार ओक यांनी शाळेसाठी २५ हजार रुपयांची देणगी दिली. निवासी मूकबधिर विद्यालयाचे कार्याध्यक्ष महादेव दबडे, मुख्याध्यापक शरद जाधव, प्राथमिक शाळेच्या प्रभारी मुख्याध्यापिका विनया कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षकांनी या कार्यक्रमाचे नियोजन केले. विनया कुलकर्णी यांनी प्रास्ताविक, तर शरद जाधव यांनी आभार मानले.

06468

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Shivneri Fort Stampede : शिवनेरी किल्ल्यावर शिवजयंती उत्सवाला गालबोट! चेंगराचेंगरीत अनेक शिवभक्त जखमी, मध्यरात्री नेमकं काय घडलं? घटनेनंतर पोलिस म्हणाले...

AI Responsibility Campaign : ‘एआय’च्या जबाबदार वापरासाठी भारतीय कटिबद्ध; २४ तासांत २,५०,९४६ जणांची प्रतिज्ञा, ‘गिनेस बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड्स’मध्ये नोंद

राष्ट्रीय सुरक्षेला धोका ३ वर्षांनी लक्षात आला, २३ मजली इमारत बांधेपर्यंत झोपलेलात का? हायकोर्टाचा नौदलाला सवाल

Latest Marathi News Live Update : शिवनेरी किल्ल्यावर राज्याचे उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार दाखल

Ladki Bahin Scheme: लाडक्या बहीणीसाठी महत्वाची बातमी! सातारा जिल्ह्यात ८५ हजार ६४ लाभार्थ्यांच्या अर्जात त्रुटी, अन्यथा हप्ता थांबणार..

SCROLL FOR NEXT