भोर, ता. १९ : शुक्रवारपासून (ता. २०) सुरू होणाऱ्या इयत्ता दहवीच्या परीक्षेस भोर आणि राजगड तालुक्यातील १० परीक्षा केंद्रांवर ३ हजार १०८ विद्यार्थी परीक्षा देणार आहेत, अशी माहिती भोरचे परिरक्षक अधिकारी हुमपरवीन शेख यांनी दिली.
भोर शहरातील भोरमधील अनंतराव थोपटे महाविद्यालयात इयत्ता दहावी परीक्षेच्या प्रश्नपत्रिका वितरण व उत्तरपत्रिका जमा करण्यासाठी परिरक्षक कक्ष उभारण्यात आला आहे. येथून भोर व राजगड तालुक्यांसह हवेली तालुक्यातील शेड शिवापूर, अशा एकूण १० परीक्षा केंद्रांसाठी प्रश्नपत्रिका व उत्तरपत्रिका दिल्या-घेतल्या जात आहेत. या सर्व परीक्षा केंद्रांवर दहावीची परीक्षा सुरळीतपणे सुरु करण्यासाठीची सर्व तयारी पूर्ण झाली आहे.
भोरच्या परिरक्षण केंद्रासाठी श्रीमती हुमेरापरवीन शेख याच्यासह शंकर दलवाई, रमेश शेटे, जीवन शिंदे, रामदास पाटील, केशव पवळे, जगदीश सुतार, राजू साळेकर, दीपक खिलारे व निळकंठ लोंढे हे सहपरीरक्षक म्हणून काम पहात आहेत. परीक्षा केंद्रांसह परिरक्षक केंद्रावर विशेष पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
दहावीच्या परीक्षेच्या परीक्षा केंद्रांची नावे व कंसात विद्यार्थी संख्या पुढीलप्रमाणे- भोर तालुका- राजा रघुनाथराव विद्यालय (४५०), छत्रपती शिवाजी विद्यालय भोर (३५०), शिवाजी विद्यालय नसरापूर (३९७), नागेश्वर विद्यालय अंबवडे (२३०), जिजामाता इंग्लिश मीडियम स्कूल भोर (२९६), शिवाजी विद्यालय किकवी (२१२). वेल्हे तालुका- सरस्वती विद्यालय आंबवणे (३२७), न्यू इंग्लिश स्कूल विंझर (१५२), तोरणा विद्यालय वेल्हे (१४८) आणि हवेली तालुका- शिवभूमी विद्यालय खेड शिवापूर(५४६).
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.