पुणे

भोरमध्ये मोकाट कुत्र्यांची होणार नसबंदी

CD

भोर, ता. २१ : भोर नगरपालिका प्रशासनाच्या वतीने शहरात मोकाट आणि बेवारस फिरणाऱ्या कुत्र्यांची नसबंदी करण्यात येणार आहे. नगरपालिकेच्या वतीने शासनाच्या आदेशानुसार युनिव्हर्सल ॲनिमल वेलफेअर सोसायटीमार्फत गुरुवारी (ता.१९) सकाळी या उपक्रमाची सुरुवात करण्यात आली.
संस्थेच्या वतीने मोकाट कुत्र्यांना पकडणे, त्यांची नसबंदी आणि लसीकरण करणे, नसबंदी व लसीकरण झालेल्यांना टॅगींग करणे, तीन-चार दिवस त्यांचा सांभाळ करणे आणि नंतर त्यांना पुन्हा सोडून देणे. या गोष्टी करण्यात येणार आहेत. नगरपालिकेच्या वतीने कचरा डेपोमध्ये नवीन शेड तयार करण्यात आले आहे. गुरुवारपासून शहरातील मोकाट कुत्री पकडण्यास सुरुवात करण्यात आली आहे. गेल्या तीन दिवसांमध्ये २२ कुत्र्यांना पकडण्यात कंपनीला यश आले आहे. पहिल्या टप्प्यात ४०-५० कुत्रे पकडल्यानंतर कंपनीचे जनावरांचे डॉक्टर्स त्यांची नसबंदी शस्रक्रिया करून लसीकरण करणार आहेत. नगरपालिका हद्दीतील सुमारे एक हजार मोकाट कुत्र्यांना पकडण्याचे आणि नसबंदी व लसीकरण करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले असल्याचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले. पुढील तीन-चार महिन्यात हे काम पूर्ण होणार आहे.
या उपक्रमाची सुरुवात करताना मुख्याधिकारी गजानन शिंदे, नगराध्यक्ष रामचंद्र आवारे, उपनगराध्यक्षा जयश्री शिंदे, भाजप गटनेते अमित सागळे, राष्ट्रवादी गटनेते केदार देशपांडे, नगरसेविका सुरेखा मळेकर, रेणुका बदक, तृप्ती सुपेकर, मयूरी गायकवाड, मनिषा पवार, स्नेहल घोडेकर, पल्लवी सागळे, मनिषा भेलके, स्नेहा पवार, नगरसेवक अनिल भेलके, कुणाल धुमाळ, जयवंत शेटे, कुणाल पलंगे, गणेश मोहिते, सचिन तारु, जगदीश किरवे, सुमंत शेटे, अनिल भेलके, तौसीफ आतार व प्रशांत जाधव उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat: अशोक खरातच्या अत्यंत जवळच्या माणसाचा अपघाती मृत्यू; शिर्डी जमीन घोटाळ्यात होते साक्षीदार

Fake Alphonso Mango in Nipani : हापूसच्या पेटीत कर्नाटकी आंबा! बाजारात ग्राहकांची मोठी फसवणूक; 700 ते 800 रुपये दराने मिळतोय आंबा

Latest Marathi News Live Update: अशोक खरातच्या ओकस कार्यालयात ईडीकडून गेल्या तीन तासांपासून झडती सुरू

Pune Sugar Protest: शेतकऱ्यांचा एल्गार!घामाच्या पैशासाठी 'आरपार'ची लढाई; ३० एप्रिलपासून पुण्यातील साखर संकुलाला बेमुदत वेढा..

Success Story: ग्रामीण भागातून न्यायालयापर्यंतचा प्रवास; कल्पेश कड न्यायाधीशपदी विराजमान, जिद्द आणि मेहनतीचा विजय!

SCROLL FOR NEXT