भोर, ता. १ : मार्च महिना सुरू झाला असून उन्हाळ्याची चाहूल लागली आहे. मात्र तालुक्यातील भाटघर आणि नीरा-देवघर धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू असल्यामुळे नीरा नदीमधील पाणी खळखळ वाहत आहे. उन्हात नदीपात्रातून पांढऱ्याशुभ्र पाण्याचे मनमोहक दृश्य टिपण्यासाठी आणि पाण्याचा खळखळणारा आवाज ऐकण्यासाठी अनेक पर्यटक नदीकिणारी गर्दी करीत आहेत.
डिसेंबर महिन्यात दोन्ही धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू केलेला आहे. नीरा-देवघरच्या वीजनिर्मिती केंद्रातून ७५० क्युसेक तर भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून एक हजार ६१० क्युसेकने पाण्याचा विसर्ग सुरू आहे. नीरा-देवघरच्या वीजनिर्मिती केंद्रातून दररोज सहा मेगाव्हॅट तर भाटघर धरणाच्या वीजनिर्मिती केंद्रातून दररोज १६ मेगावॉट वीजनिर्मिती केली जात आहे. सद्यस्थितीत भाटघर घरणात ६७.१७ टक्के तर नीरा-देवघर धरणात ७०.८५ टक्के पाणीसाठा आहे. मागील वर्षाच्या तुलनेत यावर्षीचा पाणीसाठा सरासरी सहा टक्क्यांनी जास्त आहे. नीरा नदीवरील नीरा-देवघर धरणातील वीजनिर्मिती केंद्रातून सोडलेले पाणी हे नीरा नदीतून जाते. वेळवंडी नदीवरील भाटघर धरणातून सोडण्यात आलेले पाणी हे देखील नीरा नदीलाच मिळते. त्यामुळे भाटघर धरणाच्या खालच्या बाजूपासून पाण्याच्या प्रवाहात वाढ होत आहे. उन्हात इंगवली येथील नीरा नदीवरील नेकलेक पॉईटच्या सौंदर्यात भर पडली आहे. नीरा नदीतून जाणारे पाणी हे वीर धरणात जात आहे. वीर धरणाच्या डाव्या आणि उजव्या कालव्यातून आवश्यक्तेनुसार पूर्व भागाला पाणी सोडण्यात येत आहे. पूर्वेकडील भागाला पिण्यासाठी आणि शेतीसाठी नीरा-धरण साखळीतील पाण्याचा वापर केला जात आहे.
भाटघर धरणाच्या विजनिर्मिती केंद्रातून सोडण्यात येणारे पाणी हे शुक्रवारी (ता.२७) सायंकाळपासून बंद करण्यात आले आहे. पूर्व भागाच्या मागणीनुसार हे पाणी पुन्हा सोडण्यात येणार असल्याचे जलसंपदा विभागाकडून सांगण्यात आले.
06503
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.