पुणे

भोरला ३७ प्रकरणे निकाली

CD

भोर, ता. १४ : येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयामध्ये शनिवारी (ता. १४) झालेल्या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये ३७ प्रकरणे निकाली काढून १८ लाख ८१ हजार ४६१ रुपयांची वसुली झाली. यामध्ये २७ प्रलंबित प्रकरणे आणि १० दाखल पूर्व प्रकरणाचा समावेश आहे. लोकअदालतीमध्ये एकूण ४०२ प्रलंबित प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी २७ प्रलंबित प्रकरणांमध्ये तडजोड होऊन १४ लाख ७४ हजार ६६८ रुपयांची वसुली झाली. तर १ हजार ८३ दाखल पूर्व प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी १० प्रकरणांमध्ये तडजोड होऊन ४ लाख ६ हजार ८१५ इतक्या रकमेची वसुली झाली. एकूण १ हजार ४८५ प्रकरणांपैकी ३७ प्रकरणांमध्ये तडजोड होऊन एकूण १८ लाख ८१ हजार ४६१ रुपयांची वसुली झाली.
या राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये भोरच्या सहदिवाणी न्यायाधीश श्रीमती मीना जाधव यांनी पॅनल क्रमांक १चे पॅनल न्यायाधीश म्हणून, तर ॲड. अण्णासाहेब जाधव यांनी पॅनल सदस्य म्हणून काम पाहिले. न्यायाधीश शशांक शिरसाट यांनी क्रमांक दोनचे न्यायाधीश म्हणून काम पाहिले. ॲड. प्रगती दुधाणे यांनी पॅनल सदस्य म्हणून कामकाज पाहिले.
न्यायालयाच्या आवारातील झाडांच्या रोपांना पाणी घालून या लोकअदालतीची सुरुवात करण्यात आली. यावेळी भोर वकील संघटनेचे अध्यक्ष ॲड. दत्तात्रेय उरणकर, उपाध्यक्ष ॲड. राकेश कोंडे, सर्व पदाधिकारी व वकील सदस्य यांच्यासह दिवाणी न्यायालयाचे सहायक अधिक्षक सुमेध गुजर, न्यायालयीन कर्मचारी वर्ग, पोलिस कर्मचारी, महावितरण, स्टेट बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ इंडिया, बॅंक ऑफ बडोदा, बॅंक ऑफ महाराष्ट्र, कॅनरा बॅंक, पंचायत समितीचे अधिकारी व ग्रामविकास अधिकारी उपस्थित होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Suryakumar Yadav Reaction: पुढच्या वर्षी आणखी जोमाने पुनरागमन करू... सूर्यकुमार पॅक अपनंतर काय म्हणाला? कोणावर खापर फोडले?

Rajat Patidar Reaction: खरं सांगायचं तर, आम्ही हा सामना जिंकण्यास पात्र नव्हतो; RCB चा विजय, तरीही रजत पाटीदार असं का म्हणाला?

IPL 2026 Playoff : मुंबई इंडियन्स स्पर्धेबाहेर! शेवटच्या षटकात थरार अन् RCBचा रोमहर्षक विजय; POINT TABLE मध्ये अव्वल स्थानी झेप

PM मोदींमुळे भारतात तेल-गॅस मिळतोय, आवश्यकतेनुसार वापराचं आवाहन योग्यच; मुख्यमंत्री फडणवीस काय म्हणाले?

RCB vs MI Live: तिलक वर्माची विकेट अन् रोहित शर्मा संतापला; मुंबई इंडियन्स कसेबसे सन्मानजनक धावांपर्यंत पोहोचले Video Viral

SCROLL FOR NEXT