भोर, ता. २० ः तनिष्का व्यासपीठाच्या १३व्या वर्धापनदिनानिमित्त येथील तनिष्काच्या महिला सदस्यांनी गुढी पाडव्याच्या दिवाशी ‘स्त्री प्रतिष्ठा व वाचन संस्कृती’ची गुढी उभारली. तसेच ‘मराठी वाचन संस्कृती’ची प्रतिज्ञा घेतली. शहरातील श्रीमंत गंगूताई पंतसचिव वाचनालयाच्या आवारात गुरुवारी (ता. १९) सकाळी गुढीपाडव्याच्या दिवशी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
नगरपालिकेचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांच्या हस्ते स्त्री प्रतिष्ठा व वाचन संस्कृतीची गुढी उभी करण्यात आली. यावेळी भोरच्या उपनगराध्यक्षा ॲड जयश्री शिंदे, तनिष्का व्यासपीठाच्या माजी अध्यक्षा सीमा तनपुरे, सुजाता धुमाळ, राणी कांटे, संगिता गुजर, स्वाती गांधी, मेघा आंबवले, रेखा धरु, माजी नगराध्यक्ष विठ्ठल शिंदे, तनिष्काचे विभागीय समन्वयक विजय जाधव, विलास मादगुडे, दीपक येडवे आदी उपस्थित होते. गुढीची सजावट करण्यासाठी व रांगोळी काढण्यासाठी तनपुरे, धुमाळ, गुजर, बाळासाहेब देशमाने व रमेश कोठावळे यांनी विशेष सहकार्य केले.
गुढी उभारल्यानंतर तनिष्का सदस्यांनी मराठी वाचन संस्कृतीची प्रतिज्ञा घेवून मोबाईल व सोशल मीडिया बाजूला ठेवून दररोज किमान एक तास वाचनासाठी देण्याचा संकल्प केला. मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी तनिष्का व्यासपीठाला पुस्तके भेट दिली. तनिष्का व्यासपीठामार्फत महिलांचे प्रश्न सोडविण्यासाठी, मोफत सल्ला देण्यासाठी आणि त्यांना हवे असलेले प्रशिक्षण घेण्यासाठी तनिष्कामार्फत भोरमध्ये एक तनिष्का कौन्सलिंग सेंटर सुरू करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या तनिष्का कौन्सलिंग सेंटरकरिता नगरपालिकेमार्फत जागा उपलब्ध करून देणार असल्याचे मुख्याधिकारी गजानन शिंदे यांनी सांगितले. यावेळी विद्यार्थ्यांमध्ये वाचन संस्कृती रुजविण्यासाठी उपाययोजना राबविण्याबाबत चर्चा करण्यात आली.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.