भोर, ता. २२ : शहरातून तरुण मुले-मुली पळून जाण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. भोर पोलिस ठाण्याच्या हद्दीत महिन्याला सरासरी ४ मुली पळून गेल्याचे नोंदीवरून स्पष्ट झाले आहे. ही संख्या फक्त भोर पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल झालेल्यांचीच आहे. याखेरीज तालुक्यातील पुणे-सातारा महामार्गावरील राजगड पोलिस ठाण्याअंतर्गत येणारी संख्या वेगळी आहे. यामध्ये महाविद्यालयीन तरुणी आणि नोकरी करणाऱ्या महिलांचे प्रमाण सर्वाधिक आहे.
अनेक प्रकरणांत पालक बदनामीच्या भीतीने तक्रार दाखल करत नाहीत, तर काही ठिकाणी परस्पर विवाह लावून दिले जातात. गेल्या पाच वर्षांत पळून गेलेल्यांपैकी ८ महिलांचा अद्याप शोध लागलेला नाही. प्रामुख्याने घरातील आर्थिक ओढाताण, पालकांशी संवादाचा अभाव, समाजमाध्यमांचा प्रभाव आणि वैचारिक मतभेद या कारणांमुळे हे प्रमाण वाढत असल्याचे दिसून येते. अल्पवयीन मुलींच्या बाबतीत अत्याचाराचे गुन्हे दाखल होत असले, तरी १८ वर्षांवरील तरुण-तरुणी पळून जाऊन लग्न करत आहेत. अनेकदा लग्नानंतर हे जोडपे पोलिस ठाण्यात हजर होऊन संरक्षणाची मागणी करतात. पालकांचा विरोध आणि माहिती लपवण्याच्या वृत्तीमुळे पोलिसांना तपासात अडचणी येत आहेत. पालकांनी मुलांशी संवाद वाढवावा आणि त्यांना विश्वासात घ्यावे, असे आवाहन असे आवाहन पोलिसांनी केले आहे.
भोर पोलिस ठाणे हद्दीतून पळून गेलेल्यांची संख्या २०२१ ते फेब्रुवारी २०२६ पर्यंत
वर्ष*** हरवलेल्या पुरुष***हरवलेल्या महिला*** सापडलेले पुरुष***सापडलेल्या महिला
२०२१***१२***३४***१२***३३
२०२२***१८***३१***१८***२९
२०२३***१०***३०***६***२८
२०२४***१६***४३***१४***४१
२०२५***११***२४***१०***२३
२०२६***७***१***७***१
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.