पुणे

पाचलिंगेश्वराच्या यात्रेत महादेवाचा धारपूजन सोहळा

CD

भोर, ता. ३१ ः पुणे-सातारा महामार्गावरील किकवी परिसरातील पाचलिंगे (ता. भोर) येथील पाचलिंगेश्वर महादेवाच्या यात्रेनिमित्त गावातून पाण्याच्या कावडीची मिरवणूक काढून मंदिरात धारपूजन सोहळा पार पडला. रविवारी (ता. २९) आणि सोमवारी (ता. ३०) या दोन दिवसांमध्ये पाचलिंगेमध्ये हरिनाम सप्ताह आणि यात्रा महोत्सवात विविध धार्मिक कार्यक्रम झाले. पाचलिंगेश्वर देवस्थान ट्रस्ट, वनराज तरुण मंडळ आणि पाचलिंगेमधील ग्रामस्थ व महिला मंडळाच्या वतीने या यात्रा महोत्सवाचे आयोजन केले होते.
रविवारी वीणापूजन, प्रवचन, भजन, किर्तन आणि जागर हे कार्यक्रम घेण्यात आले. सोमवारी यात्रेच्या मुख्य दिवशी सकाळी काल्याच्या कीर्तनानंतर दुपारी कावडीचे आगमन व धारपूजन सोहळा झाला. सोमवारी दुपारी नीरा नदीवरून कावडीने आणलेल्या पाण्याने महादेवाला अभिषेक करून यात्रेची सुरुवात झाली. नीरा नदीवरून कावड आणण्यासाठी पाचलिंगेच्या तरुणांसमवेत मोरवाडी (ता. भोर) येथील तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला.
कावडीची गावातून सवाद्य मिरवणूक काढण्यात आली. परंपरेप्रमाणे महादेवाच्या कावडीच्या मिरवणुकीत महिलांनी फुगड्या खेळण्याचा आनंद लुटला. मंदिराच्या टेकडीभोवती कावडीच्या पाच प्रदक्षिणा घातल्यानंतर टेकडीवरील महादेवाच्या मंदिरासमोर कावड ठेवण्यात आली. त्यानंतर भाविकांनी कावडीतील पाणी शंभूमहादेवाच्या पिंडीला घालून महादेवाचे पूजन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra Weather Alert : राज्यात पुढील पाच दिवस वादळी पावसाचा इशारा; अनेक जिल्ह्यांना ऑरेंज-येलो अलर्ट

मुंबईची पहिली महिला BMC कमिश्नर! देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू अधिकारी कशा बनल्या अश्विनी भिडे? जाणून घ्या रिअल स्टोरी...

गुगलवर 'फिमेल सर्व्हीस' सर्च करणं पडलं महागात; महिलांनी भेटायला बोलावलं अन्...; धक्कादायक घटना समोर

PAN Card Rule: 1 एप्रिलपासून 8 नवे नियम लागू! गाडी ते घर व्यवहारात कुठे लागणार PAN, कुठे नाही? नुकसान टाळण्यासाठी एकदा वाचा

'मोठी लाट आली अन् लाटेबरोबर मी आणि अक्षय समुद्रात बुडालो' लारा दत्ताने सांगितला ‘तो’ प्रसंग, म्हणाली...'अक्षयचं डोकं आपटलं अन्…'

SCROLL FOR NEXT