पुणे

त्याला फाशी द्या, मृतदेहही नको

CD

भोर, ता. ४ : नसरापूर येथील चार वर्षांच्या चिमुरडीवर बलात्कार करून खून करणाऱ्या भीमराव कांबळे याला कठोर शिक्षा करा, त्याला फाशी द्या किंवा ठेचून मारा, अशी संतप्त प्रतिक्रिया आरोपीच्या पत्नीने आणि मुलाने सोमवारी येथे व्यक्त केली.
नसरापूर (ता. भोर) येथे शुक्रवारी (ता. १) घडलेल्या या घटनेचे राज्यभर पडसाद उमटले आहेत. या पार्श्वभूमीवर, गेल्या अनेक वर्षांपासून आरोपीपासून वेगळे राहणाऱ्या त्याच्या कुटुंबीयांनी माध्यमांसमोर आपली भूमिका मांडली. आरोपीच्या पत्नीने सांगितले की, ‘२०१५ पासून आमचा त्याच्याशी कोणताही संबंध नाही. मला त्याचे तोंडही पाहायचे नाही, त्याची विल्हेवाट तिकडेच लावा.’
आरोपीच्या मुलानेही तीव्र संताप व्यक्त करत म्हटले, ‘मला त्याची वडील म्हणून ओळख सांगण्याची लाज वाटते. त्याला माझ्यासमोर आणले तर मीच त्याला फाशी देईन. त्या चिमुरडीला न्याय मिळालाच पाहिजे. मात्र, त्याच्या कृत्याची शिक्षा आम्हाला देऊ नका, आम्हाला आमचे भविष्य जगायचे आहे.’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

कोण होणार पश्चिम बंगालचा नवा मुख्यमंत्री कोण? ममतांच्या एकेकाळच्या सहकाऱ्यासह ३ नावं चर्चेत, अमित शहांनी...

Thalapathy Vijay : थलपती विजयची ऐतिहासिक विजयाकडे कूच अन् Jofra Archer च्या जुन्या ट्विटचा इंटरनेटवर धुमाकूळ

Assembly election results 2026 Live Update : भाजप २०० पार, तर तृणमूल काँग्रेस शंभरच्या आत गुंडाळणार

Love Numerology : 'या' 2 मुलांकाचे लोक प्रेमात होतात अयशस्वी; हार्ट ब्रेकमुळे बनतात प्रचंड स्ट्रॉन्ग, जीवनात मिळवतात मोठं यश

West Bengal Result: बंगालचा विजय अचानक नाही! २०१४ मध्येच लिहिलेली विजयाची स्क्रिप्ट; १२ वर्षांचा ‘मास्टर प्लॅन’ हिट, वाचा इनसाइड स्टोरी

SCROLL FOR NEXT