पुणे

युवकांनी आपत्ती काळात योगदान द्यावे

CD

बारामती, ता. ६ : ''''आपत्तीच्या काळात प्रशिक्षित युवकांची आवश्यकता असते. त्यामुळे युवकांनी आपत्ती व्यवस्थापनाचे उत्तम प्रशिक्षण घेऊन आपत्तीच्या काळात मोलाचे योगदान द्यावे,'''' असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी केले.

बारामती येथे सुरू असलेले आपत्ती व्यवस्थापन प्रभाग मंत्रालय मुंबई आणि आपत्ती व्यवस्थापन कक्ष, जिल्हाधिकारी कार्यालय पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ''आपदा मित्र'' प्रशिक्षणाला जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी भेट दिली. त्यावेळी ते बोलत होते. या कार्यक्रमास उप विभागीय अधिकारी दादासाहेब कांबळे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी विठ्ठल बनोटे, तहसिलदार विजय पाटील, परिविक्षाधीन-तहसिलदार नेहा शिंदे आदी उपस्थित होते.
बारामती आणि इंदापूर तालुक्यातील युवक या प्रशिक्षणात उत्स्फूर्तपणे सहभागी होत असल्याबाबत समाधान व्यक्त करून डॉ.देशमुख म्हणाले, पावसाळ्यात अनेक ठिकाणी पूरस्थिती निर्माण होऊन परिस्थिती गंभीर होते. अशावेळी मदत कार्यासाठी प्रशिक्षित मनुष्यबळाची गरज असते. या प्रशिक्षणामुळे आपत्तीच्या प्रसंगी आपदग्रस्तांना तातडीने मदत देणे, विविध आपत्ती संदर्भात प्रतिबंध, निवारण, पूर्वतयारी, प्रतिसाद, मदत व पुनर्वसन इत्यादी बाबी सुव्यवस्थितपणे हाताळण्यासाठी युवक-युवती तयार होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. प्रशिक्षणात महिलांचा अधिक संख्येने सहभाग कौतुकास्पद असल्याचे जिल्हाधिकारी म्हणाले.

प्रशिक्षणामध्ये बारामती आणि इंदापूर तालुक्यातील युवकांसह आशा कार्यकर्ती, अंगणवाडी सेविका, पोलिस पाटील, कोतवाल व स्वयंसेवक यांचा समावेश आहे.


06718

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Thane News: ठाण्यात मध्यरात्री तरुणांचा जीवघेणा थरार! भरधाव कारच्या बोनेटवर बसून स्टंटबाजी, Viral Videoमुळे खळबळ

Sangli District Bank Election : जिल्हा बँक निवडणुकीत पक्षीय राजकारण नको आमदार जयंत पाटील ; राज्यात दुष्काळ जाहीर करा

IPL 2027 News: खेळाडू की मार्गदर्शक? CSK ने MS Dhoni ची भूमिका जाहीर केली; मुख्य प्रशिक्षकपदी झहीर खान बसताच मोठी घोषणा

Marathi News Live Updates : छात्रों की गूंज' हा पुढील कार्यक्रम चेन्नईमध्ये

Konkan Railway Debt Repayment : रोहा-वीर दुहेरीकरण ते चिनाब ब्रिजची निर्मिती, कोकण रेल्वेचा 5 वर्षांत कायापालट; 23,500 कोटींचे नवीन प्रकल्प हाती

SCROLL FOR NEXT