पुणे

बारामतीत रविवारी मॅरेथॉन स्पर्धा

CD

बारामती, ता. १७ : येथील शरयू फाउंडेशन व बारामती रनर्स यांच्यावतीने रविवारी (ता. १९) बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन केले आहे. या स्पर्धेसाठी विक्रमी नावनोंदणी झाली असल्याची माहिती शरयू फाउंडेशनच्या अध्यक्षा शर्मिला पवार यांनी दिली.

या स्पर्धा २१ व १० कि.मी. अशा दोन प्रकारात होणार आहे. ज्यांना मॅरेथॉनमध्ये सहभागी होण्याची इच्छा आहे अशा बारामतीकरांसाठी ३ कि.मी. अंतराचीही एक फन मॅरेथॉनही होणार आहे. या फनरनसाठीही एक हजारावर बारामतीकरांनी नावनोंदणी केलेली आहे.

दरम्यान या मॅरेथॉनसाठी १३०० स्पर्धकांनी सहभाग नोंदविला असून, त्यात काही परदेशी धावपटूही सहभागी होणार आहेत. या शिवाय उत्तर प्रदेश, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाना, कर्नाटक, गुजराथ या राज्यातूनही स्पर्धक सहभागी होणार आहेत.

ही स्पर्धा सकाळी सहा वाजता सुरु होणार असून पेन्सिल चौकामार्गे कटफळ रेल्वे स्टेशन पासून पुन्हा म.ए.सो. विद्यालय अशा मार्गाने होणार आहे. समारोप म.ए.सो. विद्यालय येथे होणार आहे. स्पर्धेतील विजेत्यांना रोख पारितोषिकांनी सन्मानित केले जाणार आहे.

विरोधी पक्षनेते अजित पवार व खासदार सुप्रिया सुळे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ होणार असून भारताची सुवर्णकन्या सुधा सिंह, कविता राऊत, ललिता बाबर या आंतरराष्ट्रीय धावपटू प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. या स्पर्धेसाठी शरयू फाउंडेशन व बारामती रनर्स यांनी जय्यत तयारी केली आहे. या मॅरेथॉन स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासह स्पर्धा पाहून स्पर्धकांना प्रोत्साहन देण्यासाठी बारामतीकरांनी आवर्जून उपस्थित राहावे असे आवाहन शर्मिला पवार यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPL 2024: आजपर्यंत आयपीएलच नाही, तर T20 च्या इतिहासात जे कोणालाच जमलं नव्हतं, ते KKR ने लखनौमध्ये करून दाखवलं

CISCE Result : ‘सीआयएससीई’च्या दहावी-बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर; 'येथे' बघा रिझल्ट

IPL 2024 LSG vs KKR: दमदार फलंदाजीनंतर कोलकाताच्या गोलंदाजांनी उडवला लखनौचा धुव्वा! पाँइंट्स टेबलमध्येही गाठला पहिला नंबर

Lok Sabha Election : 'PM मोदी हे कायमच आरक्षणाच्या विरोधात, आताही त्यांना...'; राहुल गांधीची घणाघाती टीका

Sharad Pawar : तब्येतीच्या कारणामुळे शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम रद्द

SCROLL FOR NEXT