पुणे

माझ्या शेजारी बसणाऱ्यावरही कारवाई करा

CD

बारामती, ता. २ : ‘‘बारामती परिसरातही दहशत निर्माण करणाऱ्या सर्वांवर मग तो माझ्या शेजारी बसणारा असला तरी कारवाई करा,’’ अशा सूचना विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी पिंपरी चिंचवडमधील कोयता गँगने केलेल्या हल्ल्याचा संदर्भ देत पोलिस अधिकाऱ्यांना दिल्या.
बारामतीतील प्रशासकीय भवन येथे महाराष्ट्र दिनानिमित्त ध्वजवंदन केल्यानंतर सोशल सर्व्हिस सेंटरच्या वतीने लिलावर्ध गुणवंत कर्मयोगी पुरस्कारांचे वितरण व गुणवंत कर्मचाऱ्यांचा सत्कार अजित पवार यांच्या हस्ते केला गेला. त्याप्रसंगी ते बोलत होते. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, मुख्य अभियंता सुनील पावडे, उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, तहसीलदार गणेश शिंदे, मुख्याधिकारी महेश रोकडे व स्मिता काळे, गटविकास अधिकारी अनिल बागल, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. मनोज खोमणे, तालुका कृषी अधिकारी सुप्रिया बांदल, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक, प्रभाकर मोरे, शेखर कोठारी, साहिल कोठारी आदी या प्रसंगी उपस्थित होते.
बारामती परिसरातील विविध विकासकामांचा आढावा त्यांनी या प्रसंगी घेतला. बारामतीत न्यूरोसर्जन डॉ. संजय व्होरा दर महिन्याच्या तिसऱ्या शनिवारी मेडीकल कॉलेजमध्ये ओपीडी चालविणार आहेत. शहरातील इतर नामवंत डॉक्टरांनीही महिन्यातून एक दिवस तीन तास मेडीकल कॉलेजच्या ओपीडीसाठी वेळ दिली, तर अनेक अल्प उत्पन्न गटातील कुटुंबांना त्याचा फायदा होईल. सामाजिक बांधिलकीच्या भावनेतून डॉक्टरांनी हे काम करावे, असे आवाहन अजित पवार यांनी केले. बारामतीतील विविध सेवाभावी संस्थांनी शहरातील एकेका भागाची जबाबदारी स्वीकारून काम करावे, या पुढील काळात प्रत्येक गोष्टीसाठी शासकीय निधीवर अवलंबून न राहता लोकसहभाग वाढविणे गरजेचे असल्याचे त्यांनी सांगितले.

लॉजमध्ये विद्यार्थी सापडल्याबाबत नाराजी
मध्यंतरी पोलिसांनी लॉजवर घातलेल्या छाप्यामध्ये विद्यार्थी-विद्यार्थिनी आढळून आल्याच्या प्रकारावर कमालीची नाराजी व्यक्त करत अजित पवार यांनी, ‘बारामतीत चाललंय काय...?’ असे म्हणत नाराजी व्यक्त करीत पालकांनीही मुलांवर लक्ष ठेवण्याची सूचना केली.

अर्थमंत्रीपदाच्या काळात मी चढत्या क्रमाने आमदारनिधी वाढविला. एक कोटींवरून टप्याटप्याने आमदार निधी पाच कोटी रुपये केला होता. सत्ता टिकली असती; तर यंदा प्रत्येक आमदाराला सात कोटी रुपये निधी मी देऊ केला असता.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

सिलिंडरचा काळाबाजार! एकाच घरात सापडले विविध कंपन्यांचे ४० सिलिंडर अन् २३ रेग्यूलेटर, गुन्हे शाखेची कारवाई...

Numerology : 'या' 3 मूलांकाचे लोक सगळ्यात जास्त खोटं बोलतात; स्वार्थापायी करतात दुसऱ्यांचे नुकसान, सहज कुणालाही फसवण्याची वृत्ती

गॅस कनेक्शन बंद करण्याची भीती; डोंबिवलीत महिलेला ३ लाखांचा गंडा, ‘महानगर गॅस’च्या नावाने फसवणूक

BMC रोज पाणीपुरवठा करते, तरीही मुंबईला पाणी कमी का पडते? मोठे स्पष्टीकरण देत महायुती सरकारने सांगितली खरी कारणे

Santosh Deshmukh Case: ऐनवेळी प्लॅन बदलला! संतोष देशमुख प्रकरणातील आरोपीला १० कमांडोंच्या गराड्यात गावात नेलं अन्...

SCROLL FOR NEXT