पुणे

‘साहेबांना कोणीतरी थांबवायला पाहिजे’

CD

बारामती, ता. २ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत निवृत्तीची घोषणा केल्यानंतर बारामतीकरांना कमालीचा धक्का बसला. ‘पवारसाहेबांना कोणीतरी थांबवायला पाहिजे,’ अशी कार्यकर्त्यांची भावना होती. आता नेमके काय करायचे, हे कार्यकर्त्यांना समजत नसल्यामुळे अनेक कार्यकर्ते संयम बाळगून होते. विरोधी पक्षनेते अजित पवार हे याबाबत काय आदेश देतात, याची वाट शहरातील असंख्य कार्यकर्ते पाहत होते.
‘पवारसाहेबांची निवृत्ती इतक्या अचानक कशी होऊ शकेल?’ अशा चर्चा बारामतीकरांमध्ये सुरू होती. अनेक कार्यकर्त्यांना या बातमीनंतर भावना अनावर झाल्या होत्या. शहरात अनेक ठिकाणी कार्यकर्ते जमून त्यांच्या या भूमिकेविषयी चर्चा करताना दिसत होते.
माजी नगराध्यक्ष सदाशिव सातव म्हणाले, ‘‘निवृत्तीची ही वेळ नव्हती, उलट या काळामध्ये पवारसाहेबांनी खंबीरपणे उभे राहून महाराष्ट्राच्या राजकारणाला सावरायला हवे. या स्थितीत राज्याच्या राजकारणाला सावरण्यासाठी त्यांच्या इतका खंबीर नेता दुसरा असू शकत नाही.’’
माजी नगराध्यक्ष जवाहर वाघोलीकर म्हणाले, ‘‘राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा शरद पवार यांनी काढलेला आहे आणि शेवटपर्यंत त्यांनीच तो चालविला पाहिजे. पवारसाहेबांव्यतिरिक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची कल्पना देखील सहन होत नाही. त्यामुळे त्यांनी हा निर्णय तातडीने मागे घ्यावा.’’
राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर यांनीही हा निर्णय अतिशय धक्कादायक असल्याचे सांगत, साहेबांनी निवृत्ती घेतली तरी कार्यकर्त्यांच्या मनातून साहेब जाऊ शकत नाहीत, ते राष्ट्रवादीच्या प्रत्येक कार्यकर्त्याचे दैवत आहेत, असे सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

गंगोत्री-गोमुख ट्रेकवेळी भूस्खलन, महाराष्ट्रातील व्यापाऱ्याचा दरीत पडून बेपत्ता

Pakistan Terrorism : दहशतवादाच्या विळख्यात पाकिस्तान; ग्लोबल टेररिझम इंडेक्समध्ये अव्वल

'मराठीत बोल नाहीतर यूपीला परत जा', मुंबई लोकलमध्ये भाषेवरून महिला प्रवाशांमध्ये वाद पेटला; Video Viral

SA vs AUS 2nd ODI: कूपर कॉनोलीची 'Stunning Catch'! एडन मार्करमचा सुरेख फटका अन् ऑसीची परफेक्ट टायमिंग Video

Latest Marathi News Live Update : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या औषध निरीक्षक पेपरफुटीप्रकरणी मोठी अपडेट

SCROLL FOR NEXT