पुणे

नामवंत कंपनीचे बनावट स्पेअर पार्टविक्रीप्रकरणी बारामतीत गुन्हा

CD

बारामती, ता. २ ः नामवंत कंपनीचे स्पेअर पार्ट असल्याचे भासवत बनावट स्पेअर पार्ट विकणाऱ्या अंबाराम जोगाजी भोगरा (रा. स्वयंभू अपार्टमेंट, बारामती) यांच्या विरोधात बारामती शहर पोलिसांनी कॉपीराइट अॅक्टनुसार गुन्हा दाखल केला.
याबाबत कंपनीकडून रेवननाथ विष्णू केकाण (रा. काळेपडळ, हडपसर, पुणे) यांनी फिर्याद दिली. ते स्पीड सर्च अॅण्ड सिक्युरीटी नेटवर्क प्रा. लि. चंदीगड या कंपनीत ऑपरेशन हेड आहेत. या कंपनीला मोटारसायकल अॅण्ड स्कूटर इंडिया कंपनीच्या स्वामित्व हक्क रक्षणाचे अधिकार आहेत.

शहरातील कसब्यातील महादेव अॅटो सेंटर या दुकानात काही लोक स्वामित्व अधिकार असलेल्या नामवंत कंपनीचे बनावट स्पेअर पार्ट विकत असल्याची त्यांना माहिती मिळाली. पोलिसांसह छापा टाकण्यात आला असता महादेव अॅटो सेंटर दुकानात नामवंत कंपनीच्या नावाचे बनावट एअर फिल्टर, क्लच प्लेट, मडगार्ड ब्रॅकेट, हॅनगर बुश रबर, हेड रिंग, फेशर प्लेट आदी साहित्य विकले जात असल्याचे निष्पन्न झाले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Vaibhav Sooryavanshi: वैभव सूर्यवंशी आयर्लंड दौऱ्यावर जाण्यापूर्वी BCCI चा मोठा निर्णय; नेमकं काय घडलं?

"मला ही मालिका मिळू दे कारण..." रोहित परशुरामने 'कृष्णाईच्या लेकी'साठी मारुतीरायाकडे का केली होती प्रार्थना?

Latest Marathi News Live Update : छत्रपती संभाजीनगर विधान परिषद निवडणूक; दुपारी १२ वाजेपर्यंत ५२.२८ टक्के मतदान

Monsoon Delay : 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरण्या करू नका; कृषी अधिकाऱ्यांचे शेतकऱ्यांना आवाहन

Gay Dating App : गे-डेटिंग अ‍ॅपवरून सूत जुळलं; समलैंगिक संबंधांच्या इच्छेने तरुण भेटला, सात जणांच्या टोळीने गुजरातमध्ये जे केलं ते भलतचं

SCROLL FOR NEXT