पुणे

हॅपी स्ट्रीट्‌समुळे बारामतीकरांची सकाळ अविस्मरणीय

CD

बारामती, ता. १८ : कोणी लुडो खेळाचा आनंद लुटत होते तर कोणी धनुष्यबाण चालविण्याचा आनंद घेत होते. कोणी दोरीवरच्या उड्या मारत होते तर काही जण आरोग्याच्या टिप्स घेत होते. तर काहीजण लोक संगीताच्या तालावर मनसोक्त नृत्य करीत होते. निमित्त होते एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडिया या संस्थेने रविवारी (ता.१८) आयोजित केलेल्या हॅपी स्ट्रीटस या उपक्रमाचे. त्यास बारामतीकारांचा उदंड प्रतिसाद लाभला. विविध खेळात सहभाग घेतल्याने प्रत्येकाची रविवारची सकाळ अविस्मरणीय ठरली.

बारामतीत सकाळी सहा वाजल्यापासून पुढे तीन तास आबालवृद्धांनी आपले वय व हुद्दा विसरून अनेक खेळांचा आनंद लुटला. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी देखील या उपक्रमाच्या उद्घाटनानंतर प्रत्येक खेळाची बारकाईने माहिती घेतली.

वारली पेंटिंग, स्केचिंग, टॅटू काढणे, फेस पेंटिंग, पोट्रेट काढणे याचाही नागरिकांनी आनंद लुटला. या ठिकाणी बारामती स्पोर्ट्स फाउंडेशनच्या वतीने आरोग्याच्या टिप्स देण्यात आल्या तर योग प्रशिक्षकांनी योगाचे महत्त्व नागरिकांना समजून सांगितले. नितीन दोशी, नंदू व सरिता डेव्हिड, आकाश जाधव, जॉनी नवगिरे, अनिल केसकर, सचिन सस्ते, गणेश हिंगणे, ॲड. प्रभाकर बर्डे, डॉ. रेवती संत, सिद्धी पवार, सागर गोरे यांनी जुनी नवीन गाणी सादर केली.
उपक्रमाचा शेवट झुंबा नृत्याने झाला. या नृत्यांमध्ये सर्वच वयोगटातील स्त्री पुरुष मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते.

विद्या कॉर्नर ते गदिमा हा रस्ता अजित पवार यांनी सुशोभित केल्यानंतर या रस्त्याच्या माध्यमातून बारामतीकरांना विविध खेळांच्या माध्यमातून वेगळा आनंद मिळावा या उद्देशाने हॅपी स्ट्रीट्स या उपक्रमाचे आयोजन केल्याचे फोरमच्या अध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी सांगितले. मोकळ्या हवेत सकाळच्या वेळेस, नागरिकांनी मन प्रसन्न होणारे खेळ खेळावेत व नृत्याचा आनंद घ्यावा, त्यांना चार घटका विरंगुळा मिळावा, अशी या मागची संकल्पना असल्याचे सुनेत्रा पवार म्हणाल्या.

अजित पवारांनीही धरला नेम
हॅपी स्ट्रीट्स उपक्रमात धनुष्यबाण हातात घेऊन लक्ष्याचा वेध घेण्याचाही एक क्रीडा प्रकार होता. यामध्ये अजित पवार यांनीही हातात धनुष्यबाण घेत लक्ष्यावर नेम धरत अचूक वेध घेतल्यावर उपस्थितांनीही टाळ्यांचा कडकडाट केला.

बारामती शहर सर्वांग सुंदर करताना नागरिकांना खऱ्या अर्थाने त्याचा आनंद घेता आला पाहिजे हा उद्देश या उपक्रमाच्या माध्यमातून सफल झाला आहे.
- अजित पवार, विरोधी पक्षनेते

07589

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Greater Noida Bus Fire : यमुना एक्सप्रेसवेवर धावत्या स्लीपर बसला भीषण आग, ९ जणांचा होरपळून मृत्यू , जीव वाचवण्यासाठी प्रवाशांनी टाकल्या उड्या

Barshi Drought: साहेब, पाणीच नाही तर लग्नेही जमत नाहीत’; दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडे साकडे

Marathwada Rain: ५० दिवसांच्या खंडानंतर मराठवाड्यात पाऊस; हिंगोली, जालना, नांदेडसह धाराशिवमध्ये सरी

Maharashtra Rain Alert : कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव; यवतमाळ, नागपूर, चंद्रपूर, गडचिरोलीत मुसळधार पावसाची शक्यता

Global Warming: ‘सुपर एल निनो’मुळे १५ हजार मृत्यूचा धोका; शिकागो विद्यापीठाचा इशारा, जमीन आणखी तापणार

SCROLL FOR NEXT