पुणे

पालखी स्वागतासाठी लोटली अवघी बारामती

CD

बारामती, ता. १८ : कडक उन अंगावर घेत बारामतीत रविवारी (ता. १८) संत तुकाराम महाराज पालखी सोहळा विसावला. एरवी पावसाचे थेंब अंगावर घेत वारकरी मार्गक्रमण करतात, आज मात्र उन्हाच्या तीव्रतेच्या वारकरी हैराण झाले. मात्र, विठुरायाच्या ओढीने उन्हाची तमा न बाळगता पालखी सोहळा बारामतीत दाखल झाला. पालखीचे भक्तीमय व उत्साही वातावरणात स्वागत करण्यात आले. पालखी सोहळ्याच्या दर्शनासाठी अवघी बारामती लोटली होती.

राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार व सुनेत्रा पवार यांनी सपत्नीक पालखी सोहळ्याचे बारामतीच्या वेशीवर स्वागत केले. अजित पवार यांनी पालखीचे सारथ्यही केले. तसेच, वेशीवर उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, मुख्याधिकारी महेश रोकडे, तहसीलदार गणेश शिंदे, गटविकास अधिकारी अनिल बागल, पोलिस निरिक्षक सुनील महाडीक यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, विविध मंडळांचे प्रमुख यांनी प्रथेनुसार पालखीचे स्वागत केले. बारामती नगरपालिकेच्या वतीने पालखीतील सर्व वीणेकऱ्यांचे हार घालून श्रीफळ देऊन स्वागत केले.
शारदा प्रांगणात पालखी सोहळ्याच्या मुक्कामासाठी भव्य मंडप उभारण्यात आला आहे. येथे भाविकांनी पालखीच्या आगमनानंतर दर्शनासाठी एकच गर्दी केली. अतिरिक्त पोलिस अधीक्षक आनंद भोईटे, उपविभागीय पोलिस अधिकारी गणेश इंगळे, पोलिस निरिक्षक महाडीक व प्रभाकर मोरे यांनी चोख पोलिस बंदोबस्त ठेवला होता.
एन्व्हॉर्यमेंटल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने पालखी सोहळ्यातील दीड हजार वारकऱ्यांना कापडी पिशवी व स्वच्छता किट दिले. अजित पवार व सुनेत्रा पवार यांच्या हस्ते या कीटचे वाटप केले. श्रायबर डायनामिक्स डेअरीच्या वतीने थंड पाण्याचे टॅंकर वारकऱ्यांच्या सोयीसाठी दिल्याची माहिती प्रकल्प प्रमुख जितेंद्र जाधव यांनी दिली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

MPSC Paper Leak : एमपीएससी अध्यक्षांच्या राजीनाम्याची मागणी; अभिजीत दिपकेंचं उमेदवारांना आंदोलनाचं आवाहन

Umarga News : उमरगा सामाजिक वनीकरण विभागात भ्रष्टाचाराचा आरोप; कारवाईत दिरंगाईमुळे युवासेनेकडून वनरक्षकावर शाईफेक

India Squad for WI Series: हार्दिक पांड्या संघाबाहेरच, जसप्रीत बुमराहचेही नाव गायब; ऋतुराज गायकवाडची वापसी, तर एक सप्राईज पॅकेज, जाणून घ्या भन्नाट टीम इंडिया

Marathi News Live Updates : मध्य प्रदेशातील सांवर येथे भिंत कोसळून चार महिलांचा मृत्यू, पाच जण जखमी

Otur News : जुन्नर तालुक्यात प्रस्तावित कल्याण–लातूर जनकल्याण महामार्गाला तीव्र विरोध; शेतकरी आक्रमक, धरणे आंदोलनाला सुरुवात

SCROLL FOR NEXT