पुणे

बारामतीकरांकडून वारकऱ्यांची भक्तिभावाने सेवा

CD

बारामती, ता. १८ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यासाठी बारामतीकरांनी भक्तिभावाने सेवा केली. शहरातील अनेक सामाजिक संस्था, संघटना, मंडळांनी पालखीसोबत असणाऱ्या वारकऱ्यांना चहा, नाश्‍ता, जेवण, कपडे औषध वाटप, आरोग्य तपासणी, कपडे वाटप आदी सोयी उपलब्ध करून दिल्या.
बारामती तालुका मंडप मालक असोसिएशनच्या वतीने खाद्यपदार्थ, चंद्ररंग चॅरिटेबल ट्रस्टच्या वतीने मोफत वैद्यकीय तपासणी व औषधोपचार, मोता परिवाराच्या वतीने मोफत कपडे वाटप पार पडले. युवा शक्ती प्रतिष्ठानच्या वतीने सचिन गालिंदे व सहकाऱ्यांच्या वतीने अन्नदान, महात्मा गांधी चौक, अखिल तांदूळवाडी चौक यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तुंचे वाटप केले.
योगेश चिंचकर मित्र परिवाराच्या वतीने सचिन चिंचकर व अजित चिंचकर या बंधूंनी नाश्त्याची सोय केली. बाळासाहेब ठाकरे प्रतिष्ठानकडून पाणी वाटप झाले. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, जनकल्याण समितीच्या वतीने मोफत औषधोपचार व आरोग्य तपासणी केली होती.
बारामती येथील उपजिल्हा रुग्णालयाच्या वतीने मोफत औषधोपचार व तपासणी केली. आरएन बॉयलर यांच्या वतीने केळी वाटप, चंदुकाका सराफ यांच्या वतीने पाणी वाटप केले. बारामती येथील उपप्रादेशिक परिवहन विभागाच्या वतीने मोफत औषधोपचार व वारकऱ्यांचे मसाज केले.
जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने जनजागृती केली. अजय माने यांच्या वतीने पाणी व बिस्किटे वाटप केली. माई फाउंडेशन, सिंहगर्जना प्रतिष्ठान, सह्याद्री सोशल फाउंडेशन, मृत्यूंजय प्रतिष्ठान, मराठा सेवा संघ यांच्या वतीने वारकऱ्यांना मदत केली. बारामती मेडिकल फाउंडेशनचे शारदा हॉस्पिटल, निमा, आयडीएआय बारामती, एमआर असोसिएशन बारामती, केमिस्ट अॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन वतीने मोफत आरोग्य शिबिर औषधोपचार केले. जिज्ञासा पश्चिम महाराष्ट्र प्रांत व महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ नाशिक यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित मोफत वैद्यकीय शिबिराचे आयोजन केले.
इंदापूर चौक आझाद चौक रिक्षा संघटना, डी. के. ग्रुप, स्वातंत्र्य सैनिक उद्धवराव इंगुले व नॅशनल इंटिग्रेटेड मेडिकल असोसिएशनच्या वतीने मोफत आरोग्य शिबिर झाले. दूर्वांकुर मोबाईल, डॉ. ऋतुराज काळे मित्र मंडळाकडून वडापावचे वाटप केले. शारदा हॉस्पिटल, बाबा शेठ पवार मित्र परिवार, कै. संतोष वाघमारे मित्र परिवार, वस्ताद ग्रुप, मैत्री प्रतिष्ठान, एन्व्हार्यमेंटल फोरम ऑफ इंडिया, बारामती सहकारी बँक, भारतीय जनता पार्टी, चेतन जाधव मित्र मंडळ, महात्मा गांधी तरुण मंडळ, धर्मवीर संभाजी मित्र मंडळ, गणेश गायकवाड मित्र मंडळ, एल ग्रुप, कुंदन लालबिगे मित्र मंडळ, श्रीमंत वीर गोगदेव निशाण आखाडा, थंडर बॉय, होलार समाज प्रतिष्ठान, बबलू देशमुख युवा मंच, राजेंद्र बनकर मित्र परिवार, कोरे परिवार, बारामती नगर परिषद, आदित्य हिंगणे मित्र परिवार, कै. धनंजय देशमुख मेमोरिअल ट्रस्ट, अरुण नलवडे मित्र मंडळ आदींनी विविध सेवा पुरवल्या.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

iphoneच्या इतिहासात पहिल्यांदाच! Appleने लॉन्च केला पहिला फोल्डेबल iPhone Duo; मिळणार iPadसारखा अनुभव

iPhone 18 Pro अन् Pro Max मध्ये Apple ने केला मोठा धमाका! 2nm चिप, जबरदस्त कॅमेरा अन् AI फीचर्सने वेधलं लक्ष; किंमत किती?

Joe Root Record: सचिन तेंडुलकर - जेम्स अँडरसननंतर फक्त रुटनेच केला तो पराक्रम! पाँटिंग-स्टीव्ह वॉ यांचा मोडला विक्रम

Vastu Tips: घरात-बाल्कनीत पक्ष्यांचे घरटे असावे की नाही? वास्तुशास्त्रानुसार जाणून घ्या घरटे हटवणे योग्य की अयोग्य?

Pune News : सत्ता असूनही प्रशासनावर अंकुशच नाही! भाजप नगरसेवकांचा घरचा आहेर; पदाधिकाऱ्यांवरही व्यक्त केली नाराजी

SCROLL FOR NEXT