पुणे

बारामतीत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांची तयारी

CD

बारामती, ता. ४ : आगामी लोकसभा भयमुक्त व निर्भय वातावरणात पार पडाव्यात, यादृष्टीने पोलिसांनी संपूर्ण तयारी केली असल्याची माहिती अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव यांनी दिली. बारामतीत पत्रकारांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, गोरख गायकवाड, चंद्रशेखर यादव आदी उपस्थित होते.

आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध व्यवसायावर मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. दारूबंदीच्या १५३ प्रकरणात बारामती विभागात केल्या गेल्या. जुगाराच्या १९ खटले दाखल केले. सुपे हद्दीमध्ये अवैध गुटख्यावर कारवाई करण्यात आली. यात ५७ लाखांचा गुटखा जप्त करून चार जणांना अटक केली. घरगुती गॅस सिलिंडरमधून व्यावसायिक सिलिंडरमध्ये गॅस भरणाऱ्या टोळीवर कारवाई करण्यात आली आहे.

‘मोका’अंतर्गत इंदापूर व राजगड पोलिस ठाण्याच्या अंतर्गत झालेल्या घटनांच्या अनुषंगाने कारवाई केली. तीन जणांना स्थानबध्द केलेले आहे. परवानाधारक शस्त्रधारकांकडून ७७३ शस्त्रे पोलिसांनी जमा केलेली आहेत. ३६०० जणांवर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांची दिवसा व रात्रीची गस्त वाढविण्यासह वर्दळीच्या ठिकाणी व संवेदनशील ठिकाणी पोलिसांची उपस्थिती राहील याची काळजी घेण्यात येत आहे, असेही त्यांनी सांगितले. शहरातील वाहतुकीला शिस्त लावण्यासाठीही प्रयत्न सुरू असून यामध्ये नागरिक व्यापाऱ्यांच्या सूचना विचारात घेऊन याबाबत निवडणुकीनंतर आराखडा तयार करण्याचेही सूतोवाच त्यांनी केले. दरम्यान बारामतीत काल पोलिसांनी संचलन करत शहरातील विविध मार्गांवरून रूटमार्च केला.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Umarga News : आरक्षण मिळावे या मागणीसाठी बंजारा समाजातील तरुणाने संपविले जीवन

Heavy Rain : शेलगाव (ज.) मध्ये ढगफुटी सदृश्य पावसाने धुमाकूळ; लोकांच्या घरात शिरले पाणी

Anurag Thakur : जेव्हा देशाला गरज असते तेव्हा गांधी दांड्या मारतात; अनुराग ठाकूर यांची टीका

Beed Crime: बीडच्या परळीमध्ये धक्कादायक घटना! पोट फाडून पत्नीचा खून; नेमकं काय घडलं?

Mumbai News : आरक्षण वर्गीकरणाच्या न्या. बदर समितीला सहा महिन्याची मुदतवाढ

SCROLL FOR NEXT