पुणे

बारामतीचा पाण्याचा प्रश्‍न सोडविणार : सुनेत्रा पवार

CD

बारामती, ता. ३० : ‘‘मी जे काम हातात घेते, ते पूर्णत्वाला नेते. केंद्र व राज्य सरकारच्या निधीच्या माध्यमातून बारामती लोकसभा मतदारसंघातील समस्या सोडवण्याचा मी मनापासून प्रयत्न करेन. केंद्रामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार तिसऱ्यांदा सत्तेत येणार असल्यामुळे केंद्र सरकारच्या निधीच्या माध्यमातून या तालुक्यातील पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी सोडवण्यास आपण प्राधान्य देणार आहे,’’ अशी ग्वाही बारामती लोकसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवार सुनेत्रा पवार यांनी दिली.
मंगळवारी (ता. ३०) बारामती तालुक्यातील सावंतवाडी, उंडवडी कप, जराडवाडी, सोनवडी सुपे, अंजनगाव, खराडवाडी, उंडवडी सुपे, कारखेल, देऊळगाव रसाळ, सोनपीरवाडी या ठिकाणी सुनेत्रा पवार यांनी गाव सभा घेतल्या. त्यावेळी त्या बोलत होत्या. त्या म्हणाल्या, ‘‘केंद्र व राज्यांमध्ये एकाच विचाराचे सरकार असेल तर विकास अधिक गतीने होतो, ही बाब विचारात घेऊन मतदारांनी महायुतीच्या उमेदवाराच्या पाठीशी आपली ताकद उभी करावी.’’

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Sanjay Raut song on Sachin Ahir :'जे कधीच नव्हते आमचे त्याची वाट का पहावी?', संजय राऊतांची सचिन अहिरांवर गाण्यातून टीका

IND vs ENG : तो परतला... भारतीय संघाची ताकद वाढली, इंग्लंडची भलतीच कोंडी झाली! पहिल्याच सराव सत्रात नेमकं काय घडलं?

1,30,00,00,000 रुपयांचा मालक, तरीही सनी देओलच्या पायात फाटके बूट; Video Viral

Latest Marathi News Live Update : 'गोकूळ'साठी आघाडीचं आज शक्तिप्रदर्शन

Crime: फ्री मोमोजच्या बहाण्याने तरुणींना जाळ्यात ओढलं; नंतर धार्मिक स्थळी अश्लील व्हिडिओ बनवले अन्... रेहानचे भयंकर कृत्य

SCROLL FOR NEXT