पुणे

महिलेच्या खूनप्रकरणी दोघांना जन्मठेपेची शिक्षा

CD

बारामती, ता. ३० : चारित्र्याच्या संशयावरून पेटवून देत महिलेचा खून केल्याप्रकरणी दोघांना अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश आर. के. देशपांडे यांनी जन्मठेपेची शिक्षा सुनावली.
सुनील सुरेश शिंदे (रा. भीमनगर, दौंड) व स्वरुपलाल ऊर्फ दुष्काळ्या मोकाशा काळे (रा. पांढरेवस्ती, कुरकुंभ, ता. दौंड) यांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली. जानेवारी २०१९ रोजी सुनील सुरेश शिंदे, स्वरुपलाल ऊर्फ दुष्काळ्या मोकाशा काळे व फरारी असलेला आरोपी पांगारी सुनील शिंदे ऊर्फ पांगारी दुष्काळ्या काळे यांनी अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून पेटवून दिले होते. उपचारादरम्यान महिलेचा मृत्यू झाला. या प्रकरणी दौंड पोलिसांनी दोषारोपपत्र दाखल केले होते. सरकार पक्षातर्फे अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीकांत पोंदकुले यांनी महिलेचा मृत्युपूर्व जबाब व १९ साक्षीदारांच्या साक्षी नोंदविल्या. अनेक साक्षीदारांनी साक्षी फिरविल्या, तरीही भक्कम पुरावा सादर करून या खटल्यात आरोपींना जन्मठेपेची शिक्षा न्यायालयाने सुनावली.
अतिरिक्त सरकारी अभियोक्ता श्रीकांत पोंदकुले यांना कोर्ट पैरवी नलवडे, दौंड ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष डोके यांच्या मार्गदर्शनाखाली कोर्टपैरवी अंमलदार आर. डी. जगताप यांनी सहकार्य केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Divya Shinde Pune Case: ‘बिग बॉस फेम’ दिव्या शिंदेचा पुण्यात राडा! ६५ वर्षीय डॉक्टरांच्या घरात घुसून काठ्या-बेल्टने मारहाण, प्रकरण काय?

जयगड-चिपळूण-सातारा महामार्गाला वेग, ९८ किलोमीटरच्या मार्गाच्या अहवालाची प्रक्रिया; सल्लागार नियुक्तीसाठी निविदा

'आम्हाला अधिकारी व्हायचंय, तुम्ही फक्त शिक्षक द्या'; बीडच्या ZP शाळेतील मुलींची रिपोर्टिंग करत मुख्यमंत्र्यांना आर्त हाक

Latest Marathi News Live Update : पाकिस्तानात आत्मघाती हल्ला; १३ ठार, ३५ जखमी

IND vs WI: आज रंगणार पहिला वनडे! यशस्वी जैस्वालला रोहितसोबत ओपनिंगला संधी मिळणार? कुठे पाहाणार सामना, जाणून घ्या

SCROLL FOR NEXT