पुणे

चौकचौकांत चर्चा ‘तुतारी की घड्याळ’

CD

बारामती, ता. ३ : लोकसभा मतदारसंघाचा प्रचार आता अंतिम टप्प्याकडे निघाला असून, पदयात्रा, मेळावे, घरगुती गाठी भेटी, रिक्षातून होणारा प्रचार, सोशल मिडीयाच्या माध्यमातून होत असलेल्या प्रचारामुळे बारामतीचे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. चौकाचौकांतून तुतारी की घड्याळ, या स्वरूपाच्या चर्चांना जोर आला आहे.
रविवारी (ता. 5) महायुती व महाविकास आघाडी यांच्या सांगता सभा एकाच वेळेस बारामतीत दोन ठिकाणी होणार आहेत. महाविकास आघाडीची सभा जुना मोरगाव रस्त्यावरील लेंडीपट्टी येथील मैदानावर दुपारी दोन वाजता ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या उपस्थितीत होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे शहराध्यक्ष ॲॅड. संदीप गुजर यांनी दिली. महायुतीची सभा टीसी कॉलेज रोडवरील मिशन ग्राउंडवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत दुपारी दोन वाजता होणार असल्याची माहिती राष्ट्रवादी अजित पवार पक्षाचे शहराध्यक्ष जय पाटील यांनी दिली.

बूथ कमिटी कार्यकर्त्यांची लगबग
मतदानाचा दिवस जवळ येऊ लागला तशी बूथ कमिटी कार्यकर्त्यांची लगबग सुरु झाली आहे. मतदारांना त्यांचा मतदारयादीतील क्रमांक, बूथ, मतदान केंद्र यांची माहिती देणारे मेसेज व चिठ्ठ्या येऊ लागल्या आहेत. कोणते मतदार बाहेरगावी आहेत, यासह सर्व प्रकारची यादी तयार करण्याचे काम सध्या वेगाने सुरु आहे. अधिकाधिक मतदान करून घेण्याकडे सर्वच उमेदवार व त्यांच्या कार्यकर्त्यांचा कल आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Ashok Kharat Case : अशोक खरातला भेटलेल्यांची HIV टेस्ट करा, नाहीतर...; विजय वडेट्टीवारांचा इशारा

Jalgaon Cotton Production : जळगावचा कापूस हंगाम संपुष्टात! 'सीसीआय'ची खरेदी बंद, निम्म्यावरच अडकले कापूस गाठींचे उत्पादन

Manchar Accident : मंचरजवळ एकलहरे येथे भीषण अपघात! पिंपरी-चिंचवडचे वास्तुविशारद आंबेगावे पती-पत्नी व सासूचा मृत्यू, दोन मुले गंभीर जखमी

Latest Marathi News Live Update : जळगावच्या पिंपळगाव हरेश्वर ते जरंडी रस्त्यासाठी शेतकऱ्यांचे आमरण उपोषणाचा तिसरा दिवस

ग्राहक पैसे पूर्ण देतात, तर वापर न झालेला डेटा मध्यरात्रीच का रिसेट करता? टेलिकॉम कंपन्यांना राघव चड्ढांचा प्रश्न, ही डिजीटल लूट

SCROLL FOR NEXT