पुणे

मेलबर्न येथे होणाऱ्या काँग्रेससाठी राधिका शहा निमंत्रित

CD

बारामती, ता. ११ : ऑस्ट्रेलियामधील मेलबर्न येथे सप्टेंबर महिन्यात होणाऱ्या आंतरराष्ट्रीय आयएफएसओ काँग्रेससाठी बारामती येथील राधिका राधिका मिलिंद शहा (वाघोलीकर) यांना निमंत्रित करण्यात आले आहे. जगभरातील ७३ देशांमधील स्थूलपणावर शस्त्रक्रिया व उपचार करणारे नामांकित डॉक्टर्स या काँग्रेसमध्ये सहभागी होणार आहेत

इंटरनॅशनल फेडरेशन फॉर द सर्जरी ऑफ ओबेसिटी अँड मेटॉबॉलिक डिसऑर्डर (आयएफएसओ) यांच्या वतीने देण्यात येणारी शिष्यवृत्ती राधिका यांना जाहीर झाली आहे. जगातील फक्त दहाच जणांना ही शिष्यवृत्ती मिळाली आहे. भारतातील त्या एकमेव आहेत. आजपर्यंत केलेल्या कामाचा विचार करून राधिका यांना ही शिष्यवृत्ती देण्यात आली आहे.

काँग्रेससाठी राधिका यांना या संस्थेने आपणहून आमंत्रित केलेले असून, या ठिकाणी होणाऱ्या परिषदेमध्ये त्यांना शोधनिबंध सादर करता येणार आहे. जगभरातील ज्या रुग्णांना उपचारांची गरज आहे, अशा रुग्णांना सर्वोत्तम दर्जाचे उपचार प्राप्त कसे करून देता येतील, या साठी ही संस्था प्रयत्नशील असते.

आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर करणार शोधनिबंध सादर
स्थूलपणावर शस्त्रक्रिया, शस्त्रक्रिया पश्चात योग्य उपचार व देखभाल अधिक प्रभावी व्हावी या उद्देशाने जगभरातील या विषयातील तज्ज्ञ या आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर आपले शोधनिबंध व केलेल्या उपचारांची माहिती सादर करतात. राधिका शहा याही भारतात केलेल्या या कामाचे सादरीकरण व शोधनिबंध आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर सादर करणार आहेत.
दरम्यान, पूर्वीही राधिका यांनी आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक ठिकाणी शोधनिबंध सादर केले आहेत. स्थूलपणावर मात करण्यासाठी त्यांचे संशोधन अनेकांसाठी वरदान ठरलेले आहे.

10112

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

CSK vs PBKS Live: १४ किमी सायकल प्रवास ते चेन्नईकडून पदार्पण! शिक्षामित्र असलेल्या बापाच्या लेकाचा IPL प्रवास सुरू, कोण आहे प्रशांत वीर?

प्रेक्षकांच्या लाडक्या पंचायतला 6 वर्षं पूर्ण ! लवकरच रिलीज होणार पाचवा सीझन, प्राईम व्हिडिओची घोषणा

IPL 2026 Marathi News: सुनील गावस्करांचा KKR कर्णधार अजिंक्य रहाणेला सल्ला; म्हणाले, बघ, मी सांगतोय त्याचा विचार कर, नाहीतर

Pune Highway Accident News: सोरतापवाडीत मुरुम वाहतूक करणाऱ्या डंपरखाली तरुणाचा मृत्यू; हायवा चालकाविरुद्ध गुन्हा दाखल, अटक

Karad Farmer Death: कऱ्हाडच्या भोळेवाडीत शेतकऱ्याचा अंगावर वीज कोसळून मृत्यू; मुसळधार पावसाने तांबवे विभागात भीतीचे वातावरण

SCROLL FOR NEXT