बारामती, ता. २५ : इयत्ता बारावीचा यंदा बारामती तालुक्याचा निकाल ९६.३२ टक्के लागला. तालुक्यात ७७५४ विद्यार्थी या परीक्षेसाठी बसले होते. त्यापैकी ७४६९ विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. दरवर्षीप्रमाणेच यंदाही मुलींनी बाजी मारली असून, ९८.३९ टक्के मुली उत्तीर्ण झाल्या आहेत. तालुक्यात ३७६२ मुले या परीक्षेसाठी बसलेली होती. त्यापैकी ३५४१ उत्तीर्ण झाली असून, ही टक्केवारी ९४.१२ इतकी आहे. तर, ३९९२ मुलींपैकी ३९२८ मुली उत्तीर्ण झाल्या. ही टक्केवारी ९८.३९ इतकी आहे. केवळ ६४ मुली अनुत्तीर्ण झाल्या आहेत.
शंभर टक्के निकाल लागलेली महाविद्यालये पुढीलप्रमाणे- शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शिवनगर, आनंद विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय होळ, श्री सिद्धेश्वर हायस्कूल कोऱ्हाळे बुद्रुक, कै. जिजाबाई गावडे विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय पारवडी, चैतन्य इंटरनॅशनल स्कूल, धों. आ. सातव कारभारी विद्यालय बारामती, शारदा निकेतन इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय, अनंत आशा इंग्लिश मीडियम स्कूल व कनिष्ठ महाविद्यालय पळशी, आदित्य इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज वंजारवाडी, श्री शहाजी उच्च माध्यमिक विद्यालय सुपे (व्होकेशनल), एस. डी. सह्याद्री पब्लिक स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज.
इतर महाविद्यालयांच्या निकालाची टक्केवारी पुढीलप्रमाणे- तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय बारामती ९२.९०, एम. एस. काकडे ज्युनिअर कॉलेज सोमेश्वरनगर- ९०.५५, आर. एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट कनिष्ठ महाविद्यालय- ९९.०५, श्री शहाजी ज्युनिअर कॉलेज ऑफ आर्ट्स सुपे- ९९.३४, श्री छत्रपती शाहू हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज बारामती- ८९.४७, न्यू ज्युनिअर कॉलेज वडगाव निंबाळकर- ६०.८६, म.ए.सो. विद्यालय व ज्युनिअर कॉलेज बारामती- ९२.८५, श्री मयुरेश्वर विद्यालय व उच्च महाविद्यालय मोरगाव- ९३.६७, न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज वाणेवाडी- ७८.५७, नव महाराष्ट्र विद्यालय ज्युनिअर कॉलेज पणदरे- ९९.४५, शारदाबाई पवार महाविद्यालय शारदानगर- ९९.७६, कर्मवीर भाऊराव पाटील विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, सांगवी- ७०.५८, विद्या प्रतिष्ठान कला, विज्ञान, वाणिज्य महाविद्यालय- बारामती ९३.९२, सोमेश्वर विद्यालय, सोमेश्वरनगर- ९६.५७, उत्कर्ष ज्युनिअर कॉलेज, वाघळवाडी- ९६.८७, श्रीमंत शंभूसिंह महाराज ज्युनिअर कॉलेज, माळेगाव- ६६.६६, कृषी उद्योग शिक्षण संस्था काऱ्हाटी- ९९, एस.व्ही.एम. अँड ज्युनिअर कॉलेज भिकोबानगर- ९८.६१, सद्गुरु शिक्षण मंडळ लोणी भापकर- ९०, शारदाबाई पवार विद्यानिकेतन शारदानगर- ९९.५३, श्री सिद्धेश्वर ज्युनिअर कॉलेज कोऱ्हाळे बुद्रुक- ९९.५८, म.ए.सो. उच्च माध्यमिक विद्यालय- ८८.३७, एस.पी.सी.टी.एस. ज्युनिअर कॉलेज ऑफ सायन्स अँड कॉमर्स- ९९.७१, क्रिएटिव्ह इंटरनॅशनल स्कूल व ज्युनिअर कॉलेज- ९९.४०, अजितदादा इंग्लिश मीडियम स्कूल संग्राम नगर- ९९.८१, शारदाबाई पवार आयटीआय शारदानगर- ८३.३३, मयुरेश्वर प्रा. आयटीआय खंडुखैरेवाडी सुपे- ६६.६६, शासकीय आयटीआय- ८६.२०, कृषी उद्योग मूल संस्था खाजगी आयटीआय- ६६.६६, तुळजाराम चतुरचंद महाविद्यालय (व्होकेशनल)- ९३.३३, मुकुटराव साहेबराव काकडे महाविद्यालय सोमेश्वरनगर- ७५, आर. एन. अगरवाल टेक्निकल इन्स्टिट्यूट व ज्युनिअर कॉलेज (व्होकेशनल)- ९०, शारदाबाई पवार विद्यालय व ज्युनिअर कॉलेज शिवनगर (व्होकेशनल)- ९१.८९, न्यू इंग्लिश स्कूल ज्युनिअर कॉलेज वाणेवाडी (व्होकेशनल)- ८९.४७.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.