पुणे

उजनी प्रशासनावर कारवाईची मागणी

CD

बारामती, ता. २३ : उजनी जलाशयामध्ये बोटिंग किंवा नौकाविहाराची परवानगी नसतानाही अनेक वर्षांपासून बेकायदा बोट चालविल्या होत होत्या. ही बाब माहिती असूनही त्या विरुध्द कारवाई न केल्याबद्दल उजनी धरण प्रशासनासह महसूलविभागाच्या अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी ग्राहक संरक्षण परिषदेचे सदस्य ॲड. तुषार झेंडे पाटील यांनी राज्याच्या मुख्य सचिवांकडे केली आहे. भंगारातून खरेदी केलेल्या बोटींचा होणारा वापर, सुरक्षिततेसाठी लाइफ जँकेट नसणे यासह परवानगी नसताना बोटींग किंवा नौकाविहार करणे या बाबत बेकायदा आहेत. याबाबी होत असल्याची माहिती असूनही उजनी धरण प्रशासन व महसूल विभागाने या रोखण्यासाठी काहीही केलेले नाही. सन २०१७ मध्येही बोट उलटून सहा डॉक्टरांचा दुर्दैवी अंत झालेला होता. त्या नंतरही प्रशासनाला जाग आली नाही. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे पुन्हा एकदा सहा जणांचा जीव गेल्याने या बाबत कारवाई व्हावी व मृतांच्या नातेवाइकांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी पाच लाखांची मदत व्हावी अशी मागणी अँड. झेंडे यांनी केली आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Crime : 'कुराश' खेळांच्या बनावट प्रमाणपत्रांचे रॅकेट राज्यभर पसरलेले; एक हजाराहून अधिक बोगस प्रमाणपत्रे वाटली

Bribe Case : कारवाई न करण्यासाठी पाच लाखांची लाच घेताना पोलीस कर्मचारी जाळ्यात

Ganesh Utsav 2026: महाराष्ट्रापासून मिझोरमपर्यंत! कशी साजरी होते गणेश चतुर्थी? जाणून घ्या वेगवेगळ्या राज्यांतील अनोख्या परंपरा!

बायकोचं शीर कापून फ्रीजमध्ये ठेवलं! जेलमधून सुटल्यानंतर पत्नीच्या 'शुगर डॅडी'ला ठार मारण्याची धमकी

Pune News : भाजपमधील धुसफूशीचा मोहोळांच्या उपस्थितीत सोक्षमोक्ष? आज नगरसेवकांची होणार बैठक

SCROLL FOR NEXT