पुणे

बारामतीत पावसाची तासभर जोरदार हजेरी

CD

बारामती, ता. २ : शहरात रविवारी (ता. २) संध्याकाळी सहाच्या सुमारास मुसळधार पाऊस झाला. गेल्या काही दिवसांपासून तापलेल्या उन्हामुळे बारामतीकरांची लाही लाही झाली होती. आजही सकाळपासूनच उन्हाचा तडाखा जाणवत होता. दुपारनंतर आभाळात ढगांची गर्दी झाली होती, संध्याकाळी सहाच्या सुमारास पावसास प्रारंभ झाला अर्ध्या तासाहून अधिक काळ जोरदार पाऊस बरसला. पावसासोबत वाऱ्याचा वेगही मोठा होता. या पावसाने शहरातील अनेक रस्त्यांवर पाणी साचून राहिले होते. अनेक इमारतींमध्ये विशेषतः बेसमेंटमध्ये रस्त्यावरून वाहणारे पाणी घुसल्याने व्यापारी संकुलात तळी साचली होती. रस्त्यावर साचून राहणारे पावसाचे पाणी हा पावसाळ्यात नेहमीचाच विषय बनलेला असूनही त्याकडे प्रशासन लक्ष देत नाही, रस्त्यांवर पाणी साचून राहत असल्याने डांबरीकरण केलेले रस्तेही खड्डेमय होऊ लागले आहेत. शहरातील भिगवण रस्त्यावर या पावसाने पाण्याचे तळे साचले होते. या तळ्यातून लोकांना वाट काढत कसरत करत जावे लागत होते. अनेक ठिकाणी सुशोभीकरणाची कामे सुरू आहेत, मात्र पावसाचे पडणारे पाणी वाहून जाण्याची व्यवस्था नसल्याने लोकांना या पाण्यातून मार्गक्रमण करावी लागत आहे.नगरपालिकेने रस्त्यावर असणाऱ्या पाण्याबाबत उपाययोजना करावी अशी बारामतीकरांची मागणी आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Flight Guidelines: विमानाच्या उड्डाणासाठी नवे नियम जाहीर! पायलटचा निर्णय अंतिम असणार; दबाव टाकणाऱ्यांवर कठोर कारवाई

पंखा लावण्यावरून वाद; महाराष्ट्रातील मोठ्या विद्यापीठात तरुणीचं विद्यार्थिनीसोबत भयंकर कृत्य, पोलिसांवरही दबाव...

Manchar Crime : मंचर येथे प्रांत अधिकारी गोविंद शिंदे यांना दोन लाख रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले; एसीबीची कारवाई

Mumbai Local Mega Block : कांदिवली-बोरिवलीदरम्यान रेल्वेचा विशेष मेगाब्लॉक; लोकल वाहतुकीत बदल

Talegaon Station News : तळेगाव-चाकण-शिक्रापूर रस्तेकामाचा अंतिम अध्यादेश जारी; डीबीओटी तत्वावर होणार काम

SCROLL FOR NEXT