पुणे

बारामतीत आढळली गंजलेली पाच पिस्तुले

CD

बारामती, ता. २ : शहरातील महात्मा फुले साठवण तलावाजवळ गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तूल सापडले.
कोणीतरी अज्ञात व्यक्तीने साठवण तलावाजवळ पाच पिस्तुले टाकून दिल्याची गोपनीय माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी त्या ठिकाणी धाव घेतली. बारामती शहर पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक संतोष घोळवे व इतर अधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी असलेली गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तुले ताब्यात घेतली.
ही पिस्तुले नेमकी कोणी या ठिकाणी आणून टाकली व ही कोणाच्या मालकीची आहेत, याचा तपास पोलिसांनी सुरू केला आहे. मात्र, बारामतीसारख्या शांतताप्रिय शहरामध्ये अचानक एकाच वेळेस पाच पिस्तुले सापडण्याची ही घटना चिंताजनक असल्याची चर्चा नागरिकांमध्ये आहे.
बारामती शहरामध्ये गेल्या काही वर्षांमध्ये पोलिसांनी अनेक युवकांकडून बेकायदा गावठी कट्टे व पिस्तूल जप्त केलेले आहेत. मध्य प्रदेशमधून अतिशय कमी किमतीमध्ये सहजतेने ही शस्त्रे मिळत असल्याची पोलिसांची माहिती आहे. काही एजंट या परिसरात येऊन पिस्तुलांची विक्री देखील करतात, अशी माहिती पोलिसांकडे असून त्या दृष्टीने देखील तपास सुरू आहे.
शस्त्रे बाळगण्याविरुद्ध गोपनीय बातमीदारांमार्फत पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मात्र, एकाच वेळेस गंजलेल्या अवस्थेतील पाच पिस्तुले कोणी या ठिकाणी आणून टाकून दिली असतील, या दृष्टीने पोलिसांनी बारकाईने तपास सुरू केला आहे. या घटनेला पोलिस विभागाने गांभीर्याने घेतले असून त्याचा सखोल तपास सुरू केल्याचे पोलिस सूत्रांनी सांगितले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IND vs SL Final: फायनलमध्ये श्रीलंकेचा सामना कसा करणार? हरमनप्रीत कौरने उघड केला टीम इंडियाचा प्लॅन; फलंदाजांना दिला खास सल्ला

पाठलाग करत गोळीबार, खाली पडल्यावर डोक्यात झाडली गोळी; १६ वर्षे लहान प्रियकराने शालिनीची केली हत्या, स्वत:लाही संपवलं

Marathi News Live Updates : दगडूशेठ गणपती मंडळाची जय्यत तयारी पूर्ण, वृंदावनच्या प्रेम मंदिराची भव्य प्रतिकृती ठरणार यंदाच्या मिरवणुकीचे आकर्षण

Police PSI Success Story: परीक्षेत यशानंतर १३ वर्षे न्यायासाठी लढा, अखेर PSI पदी निवड; पोलिसाला मिळाला न्याय

Panvel Crime: एनओसीसाठी एक कोटींची मागणी, लाच प्रकरणी सीजीएसटी अधीक्षकासह सल्लागार अटकेत

SCROLL FOR NEXT