पुणे

महावितरणच्या बारामती परिमंडळामध्ये चार नूतन अधीक्षक अभियंते रुजू

CD

बारामती, ता. २ : महावितरण प्रशासनातर्फे नुकत्याच झालेल्या बदली व पदोन्नती प्रक्रियेतून बारामती परिमंडलास ४ नूतन अधीक्षक अभियंता मिळाले असून परिमंडलाचा अधीक्षक अभियंता पदाचा कोरम पूर्ण झाला आहे. या चारही अधीक्षक अभियंत्यांनी सोमवारी (ता. १) आपापल्या पदाचा पदभार स्वीकारून कामाला सुरुवात केली आहे.

बारामती परिमंडल कार्यालयात पायाभूत आराखडा विभागाचे प्रमुख असलेले अधीक्षक अभियंता हे पद रिक्त होते. या पदावर बारामती मंडल कार्यालयातील चंद्रशेखर पाटील यांची बदली झाली. बारामती मंडल कार्यालयाच्या अधीक्षक अभियंता पदी अहमदनगर शहर तथा ग्रामीण विभागाचे कार्यकारी अभियंता दीपक लहामगे यांची पदोन्नती झाली. त्यांनीही बारामती अधीक्षक अभियंता पदाचा कारभार स्वीकारला.
सोलापूर मंडल अधीक्षक अभियंतापदी भांडूप शहर परिमंडळात कार्यकारी अभियंता पदी असलेले सुनील माने यांची पदोन्नतीवर सोलापूर अधीक्षक अभियंता पदी बदली झाली.

कवठे महांकाळ (जि. सांगली) विभागात कार्यकारी अभियंता पदी असलेले बाळासाहेब हळनोर यांची सातारा अधीक्षक अभियंता पदावर बढती झाली. त्यांनी सातारा मंडल कार्यालयाचा पदभार स्वीकारला.
बारामतीत मंगळवारी (ता. २) झालेल्या बैठकीत मुख्य अभियंता सुनील पावडे यांनी चारही अधीक्षक अभियंत्यांचे अभिनंदन केले.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Maharashtra co-op directive: सहकार खात्याचा नवा आदेश; पिग्मी एजंटचे कमिशन २.५ टक्क्यांवर मर्यादित, हजारो कुटुंबांच्या उदरनिर्वाहावर गदा

Elderly rights in Umarga: ‘माता-पिता व ज्येष्ठ नागरिक अधिनियम’चा प्रभावी वापर : मुरूमच्या ७४ वर्षीय आईला चारही मुलांकडून दरमहा १२ हजार निर्वाहभत्ता

Akola mining dispute: अप्पर जिल्हाधिकाऱ्यांवर बेकायदेशीर रकमेच्या मागणीचा आरोप; एमआयडीसी पोलिस ठाण्यात खाण-क्रशर उद्योजक संघाची तक्रार

Anjangaon News: पुतळ्यावरुन वाद! फरांडे महाराजांनी स्पष्ट केली भूमिका; अंजनगावात तिसऱ्या दिवशी नेमकं काय घडलं?

CSK vs PBKS Live: आयुष म्हात्रेने 'चेपॉक' गाजवले! IPL मध्ये ३ मोठे विक्रम नोंदवले; सर्फराज, शिवमनेही झोडले, तगडे लक्ष्य ठेवले

SCROLL FOR NEXT