पुणे

पालखी सोहळ्याच्या स्वागतासाठी बारामती सज्ज

CD

बारामती, ता. ५ : संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याचे शनिवारी (ता. ६) तसेच श्री संत सोपानकाका महाराज पालखी सोहळ्याचे मंगळवारी (ता. ९) बारामती शहरात आगमन होत आहे. त्यासाठी बारामती नगरपालिका प्रशासनाने जय्यत तयारी केल्याची माहिती मुख्याधिकारी महेश रोकडे यांनी दिली.
पालखीचा मुक्काम शारदा प्रांगण येथे होणार असून त्यासाठी नगरपालिकेने मंडप उभारला आहे. वारकऱ्यांची गैरसोय होऊ नये यासाठी युद्धपातळीवर प्रशासन ॲक्शन मोडवर आहे. स्वत: उपमुख्यमंत्री अजित पवार यंदा बारामती ते काटेवाडी अंतर चालत पालखी सोहळ्यात सहभागी होणार असल्याने प्रशासनाने अधिक तयारी केली आहे.
पालखी मार्गावरील रस्‍त्‍याचे पॅच वर्क झाले असून वारकरी पुतळा सुशोभीकरण झाले आहे. रस्‍त्याची स्वच्छ‍ता, संपूर्ण शहरात धूर फवारणी, सार्वजनिक शौचालय दुरुस्ती आणि स्वच्छतेची कामे पूर्ण झाली आहेत.
सर्व पथदिवे सुस्थितीत राहतील याची खबरदारी घेतली आहे. स्वच्छ, शुद्ध पाणी पुरवठा सुरळीत राहील याची दक्षता घेतली आहे. शहरातील हातपंप दुरुस्त करून विंधन विहीरी निर्जंतुकीकरण करण्यात आले आहे. शारदा प्रांगण येथे मंडप, व्यासपीठ उभे केले आहे. वीज, स्वच्छतागृह, स्नानगृह तसेच निवाऱ्याची व्यवस्था केली आहे. पालखीच्या कामासाठी मुख्याधिकाऱ्यांसह ४५० कर्मचारी कार्यरत आहेत.
टि. सी. कॉलेज, विद्या प्रतिष्ठानचे विद्यार्थी स्वच्छता करणार आहेत. यंदा १२०० स्वच्छतागृह विविध ठिकाणी लावण्याचे नियोजन केले आहे. मार्केट यार्ड-इंदापूर रस्ता, मोतीबाग चौक, घोलप ऑटो, हॉटेल सुदित, देसाई इस्टेयट, तुपे बंगला, कुलकर्णी बंगला, रेल्वे स्टेशन, पतंजली स्टोअर-भिगवण रस्ता, शिवकृपा सोसायटी, गोरे चाळ, श्रॉफ पेट्रोल पंप, नेवसे रस्ता, दाते गणेश मंदिर, सांस्कृतिक केंद्र, वणवे मळा, नाना नानी पार्क, पांढरीचा महादेव, कृषी उत्पन्न बाजार समिती (जळोची) येथे ही स्वच्छतागृहे असतील. बारामती नगरपरिषद आणि सजग नागरिक मंच यांनी शौचालय व्यवस्थापनाचे नियोजन केले आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Student Protest: राज्य सरकारचा मोठा निर्णय! 'एमपीएससी'च्या सचिवांची बदली; पुण्यात विद्यार्थ्यांचं आंदोलन तीव्र

Manoj Jarange Patil : मनोज जरांगेंच्या अडचणीत आणखी वाढ? कार्यकर्त्यांनी महिलांना अश्लील शिवीगाळ केल्याप्रकरणी पोलिसांत तक्रार

गायत्री दातारने सांगितलं कसं आहे सासरचं वातावरण; म्हणते- सासूबाई मला काम करू देत नाहीत कारण...

Latest Marathi News Live Update : बीड, जळगाव जिल्ह्यातील भाजपसह शरद पवार गटातील नेत्यांसह कार्यकर्त्यांचा काँग्रेस प्रवेश

Asian Games 2026 : बॉक्सिंगमध्ये सुवर्ण हॅटट्रिक! कुस्तीपटू सुजीत कालकलचे रोमहर्षक सुवर्ण, भारताची पदकतालिकेत मोठी भरारी

SCROLL FOR NEXT