पुणे

पत्नीला पळवून नेलेल्याच्या अल्पवयीन भावाचे अपहरण

CD

बारामती, ता. ९ : पत्नीला पळवून नेल्याचा राग मनात धरून ज्या युवकाने पत्नीला पळवून नेले आहे त्याच्या अल्पवयीन भावाचे अपहरण केल्याप्रकरणी बारामती शहर पोलिसांनी एकास अटक केली.
जोपर्यंत माझ्या पत्नीला आणून सोडत नाही, तोपर्यंत तुझ्या भावाला सोडणार नाही, अशी धमकी संबंधित युवकाने दिली होती. या प्रकरणी आठ जुलै रोजी बारामती शहर पोलिसात अपहणाची फिर्याद दाखल केली होती. त्यानंतर शहर पोलिसांनी तातडीने दोन पथके तयार करून तपास सुरु केला होता. वारंवार लोकेशन बदलून आरोपी हुलकावणी देण्याचा प्रयत्न करत होता. तांत्रिक विश्लेषणाद्वारे माग काढून सांगली जिल्ह्यातील खानापूर येथून आरोपीस ताब्यात घेऊन संबंधित अल्पवयीन मुलाची शिताफीने सुटका केली.
जिल्हा पोलिस अधीक्षक पंकज देशमुख, अतिरिक्त पोलिस अधीक्षक संजय जाधव, उपविभागीय पोलिस अधिकारी सुदर्शन राठोड, स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलिस निरिक्षक अविनाश शिळीमकर, शहरचे पोलिस निरिक्षक संतोष घोळवे, सहाय्यक पोलिस निरीक्षक गजानन चेके व कुलदीप संकपाळ, फौजदार युवराज घोडके, पोलिस हवालदार यशवंत पवार, मोहंमद अंजर मोमीन, अंकुश दळवी यांनी ही कामगिरी पार पाडली.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Asia Cup: पुन्हा तोच ड्रामा! हरमनप्रीतच्या टीम इंडियानेही मोहसिन नक्वीच्या हातून नाकारली ट्रॉफी; Final नंतर काय घडलं?

Asia Cup 2026 Final: भारतीय संघ आठव्यांदा चॅम्पियन! फायनलमध्ये श्रीलंकेला पराभूत करत जिंकले विजतेपद

IND vs AFG, 1st T20I: ७ सिक्स अन् ७ फोर... अभिषेक शर्माचं वादळ घोंगावलं, पण शतक हुकलं! भारताचा १४ ओव्हरमध्येच दणदणीत विजय

Pune Navale Bridge : पुण्यातील नवले पुलाजवळ अभिनेत्रीसोबत धक्कादायक प्रकार; आधी गाडीला धडक अन् मग हात ओढून पळवून नेण्याचा प्रयत्न

Railway Accident: रेल्वे गेट ९६ जवळ स्विफ्ट गाडी २० फूट खड्ड्यात कोसळली; तीन पलट्यांनंतरही एअरबॅगमुळे पाच जणांचे प्राण वाचले

SCROLL FOR NEXT