बारामती, ता. ३० : शहरात दुचाकी चोऱ्यांचे सत्र थांबत नसतानाच शुक्रवारी (ता. ३०) पहाटे ह्युंडाई क्रेटा मोटारच चोरट्यांनी चोरुन नेली. दुचाकीपाठोपाठ आता मोटारींचीही चोरी झाल्याने बारामतीकरांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
शहरातील अवधूतनगरमधील अतुल शांतिलाल कोठारी यांची ह्युंडाई क्रेटा (क्र. एमएच २५ आर ८८४९) पहाटे साडेतीनच्या सुमारास राहत्या घरासमोरून चोरट्यांनी सुरु करून चोरुन नेली. तसेच, सुनील दत्त सुभाषचंद्र वैद्य यांच्या ह्युंडाई क्रेटा मोटारीच्या दोन्ही नंबरप्लेट चोरट्यांनी चोरुन नेल्याचीही घटना घडली आहे. अत्यंत आधुनिक समजली जाणारी व चावी नसलेली बटण स्टार्ट असलेली मोटार चोरट्यांनी सहजतेने सुरु करून चालवत चोरुन नेल्याने वाहनचालकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. शहरात अनेक जण पार्किंगची सुविधा नसल्याने सर्रास रस्त्यावरच चार चाकी वाहने पार्क करतात. मात्र, या चोरीच्या पार्श्वभूमीवर लोकांत घबराटीचे वातावरण आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.