बारामती, ता. ३० : शहरातील अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली असून बारामती नगरपालिकेने तातडीने या रस्त्यांची दुरुस्ती करावी अशी मागणी माजी नगरसेवक सुभाष ढोले यांनी केली आहे.
मुख्याधिकारी महेश रोकडे यांना या संदर्भात पत्र देत ढोले यांनी रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी केली आहे. या पत्रात त्यांनी बारामतीत पिण्याचे पाणी, पावसाचे पाणी, भुयारी गटारे या कामांच्या पाइपलाइन व अन्य कामांसाठी सातत्याने रस्ते खोदाई होत आहे. काम पूर्ण झाल्यानंतर योग्य प्रकारे रस्ते बुजविण्याचे कष्ट घेतले जात नसल्याचे नमूद केले आहे.
पालिकेच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये समन्वय नसल्याने हे घडते आहे. काम पूर्ण होऊन दोन-तीन महिने झाले तरी खोदलेले चर, खड्डे आहे त्याच स्थितीत असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
शहरातील पंचायत समितीसमोरील चौकापासून ते अशोकनगर, देशपांडे हॉस्पिटलकडे जाणारा रस्ता, आमराई परिसरातील विहिरीसमोरील रस्ता, महावीर भवन मागील रस्ता, जिल्हा बॅंक शाखेसमोरील रस्ता, सांस्कृतिक केंद्र ते मार्केट यार्ड, सांस्कृतिक केंद्र ते लेंगरेकर पंप, मटण मार्केट ते जामा मशीद, चांदशाहवली दर्गा रस्ता, गोकूळवाडी ते तांदूळवाडी वेस, स्वामी समर्थ मंदिर व गणपती मंदिर या भागातील रस्त्यांची दुरवस्था आहे. शहरातील अंतर्गत रस्त्यावरून प्रवास करणे नागरिकांसाठी जिकिरीचे ठरत आहे. या रस्त्यांच्या कामाची दुरुस्ती दर्जेदार व्हावी.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.