पुणे

लाडकी बहिण योजनेसाठी ३५ हजार कोटींची तरतूद

CD

बारामती, ता. ३ : ‘‘मुख्यमंत्री लाडकी बहिण योजनेच्या उर्वरित नऊ महिन्यांसाठी ३५ हजार कोटींची तरतूद केलेली आहे. त्यामुळे या योजनेमध्ये कोणतीही अडचण येणार नाही,’’ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.
बारामतीतील बूथ कमिटी कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात त्यांनी माहिती दिली. तसेच त्यांनी आपला स्वभाव बदलल्याचे जाहीरपणे सांगितले. ते म्हणाले, ‘‘जनसन्मान यात्रा सुरू झाल्यापासूनच कोणावरही टीका करायची नाही, कोणाविषयी काहीही बोलायचे नाही, असे मी ठरवूनच टाकले आहे, मी नम्र झालो आहे. कोणावरही चिडत नाही, तुम्हाला आता हसणारा अजित पवार दिसतोय ना? कार्यकर्त्यांनीही टीका करण्याच्या भानगडीत पडू नये. आपण केलेली विकासकामे मोठी आहेत. त्यामुळे ती कामेच आपण लोकांपर्यंत घेऊन जाऊ. कार्यकर्त्यांनीही आता बदल करायला हवा.’’
दरम्यान, पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषदांच्या शाळांमध्ये मुलींची संख्या अधिक असेल त्या प्राधान्यक्रमाने जिल्हा नियोजन विकास निधीतून सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यासाठी टप्प्याटप्प्याने निधी देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.

‘भुयार यांचे विधान अयोग्य’
आमदार देवेंद्र भुयार यांनी केलेल्या महिलांबाबतचे विधान अयोग्य असून, त्यांनी तातडीने दिलगिरी व्यक्त करावी व या पुढील काळात बोलताना काळजी घ्यावी, अशा सूचना त्यांना दिल्याचेही अजित पवार यांनी सांगितले. भुयार यांनी त्यांच्या वाक्याचा अर्थ वेगळा होता, असे मला सांगितले; तरी चूक ही चूकच असल्याने ती चूक दुरुस्त करण्यास त्यांना सांगितल्याचे ते म्हणाले.

‘अल्पवयीन’च्या वयात
बदल करण्याची गरज
‘‘गेल्या काही दिवसांत पुणे व बारामती परिसरात घडलेल्या विविध गुन्हेगारी घटनांमध्ये अल्पवयीन मुलांचा समावेश ही चिंताजनक बाब आहे, कायद्यामध्ये अल्पवयीन या निकषाची व्याख्या बदलून वय मुलांसाठी १४ तर मुलींसाठी १२ वर्षे करण्याच्या संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांची चर्चा करू,’’ अशी माहिती अजित पवार यांनी बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत दिली. ते म्हणाले, ‘‘अनेक घटनांमध्ये अल्पवयीन असल्याने कितीही गंभीर गुन्हा झाला तरी त्याला कायद्याने फार काही करता येत नाही. ही त्रुटी दूर करण्याच्या दृष्टीने आता पावले उचलण्याची गरज आहे. याबाबत कायदा करताना त्यासाठी केंद्र सरकारशी विचारविनिमय करावा लागतो. देशाचे गृहमंत्री अमित शहा यांच्या समवेत आगामी काळात होणाऱ्या चर्चेमध्ये मी याबाबत बोलणार आहे. बारामतीत घडलेल्या घटनांच्या पार्श्वभूमीवर अल्पवयीन मुलांचा गुन्हेगारी मधला वाढता सहभाग, ही बाब सामाजिकदृष्ट्या चिंताजनक आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

IPS Officers Transfers: महाराष्ट्रात पोलीस दलात मोठा फेरबदल! २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदली; कुणाची कुठे नेमणूक? जाणून घ्या यादी...

IPL 2026 Point Table: गुजरात टायटन्सने विजय मिळवून PlayOff ची चुरस अधिक रंजक बनवली; रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूवर सहज मात

HSC Result: मोठी बातमी! महाराष्ट्र बोर्डाच्या १२वी निकालाची तारीख जाहीर, कधी आणि कसा पाहता येणार? जाणून घ्या संपुर्ण प्रक्रिया

GT vs RCB Live: एवढा राग...! शुभमन गिलची कॅच घेतल्यावर विराट कोहलीने काय केलं? त्याच्याकडून अशी अपेक्षा नव्हती Video Viral

Pune News : पोलिस महासंचालक सन्मानचिन्ह जाहीर; पुणे, पिंपरी-चिंचवड आणि पुणे ग्रामीणमधील ३२ अधिकारी, अंमलदारांचा समावेश

SCROLL FOR NEXT