पुणे

बारामतीत राबविणार शक्ती अभियान

CD

बारामती, ता. ४ : येथील महाविद्यालयातील खुनाची घटना, मुलांवरील अत्याचार व इतर घटनांच्या पार्श्‍वभूमीवर बारामती पोलिसांकडून शक्ती अभियान राबविण्यात येणार आहे. अतिरिक्त पोलिस अधीक्षक गणेश बिरादार व उपविभागीय पोलिस अधिकारी डॉ. सुदर्शन राठोड यांनी याबाबत माहिती दिली.
महिला व मुलींना सुरक्षितता प्रदान करणे, चुकीचे प्रकार व छेडछाड टाळण्यासह भयमुक्त वातावरण तयार करण्यासाठी हे अभियान सातत्याने राबविले जाणार आहे. तसेच बारामतीत या अभियानाला यश आले तर ते सुरवातीला जिल्हास्तरावर आणि त्यानंतर राज्यस्तरावर राबविण्यात येईल, असे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

काय आहे शक्ती अभियान
महिलांचा सन्मान, बालकांची सुरक्षा व युवकांचे प्रबोधन यावर आधारित हे अभियान राबविले जाणार आहे. यात शक्तीबॉक्स (तक्रारपेटी) विविध ठिकाणी ठेवला जाईल. यामध्ये महिला व मुली आपल्या तक्रारी लेखी स्वरूपात टाकू शकतील.
परिसरातील शाळा, कॉलेज, सर्व सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, रुग्णालय, बसस्थानक, कोचिंग क्लासेस, महिला वसतिगृह, पोस्ट ऑफीस या ठिकाणी पोलिसांमार्फत ‘शक्तीबॉक्स’ ठेवला जाईल.
शक्तीनंबर : ‘एक कॉल, प्रॉब्लेम सॉल्व्ह’ ९२०९३९४९१७ या क्रमांकांची सेवा ही २४ तास सुरू ठेवण्यात येणार आहे. त्यावर फोन अथवा मेसेज करून तक्रार केल्यास सदर तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याबाबत व त्यावर योग्य ती कारवाई करण्याबाबत दक्षता घेण्यात येणार आहे. तसेच तक्रार करणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवण्यात येईल असेल.
शक्तीकक्ष : उपविभागीय पोलिस अधिकारी कार्यालय व प्रत्येक पोलिस ठाण्यात शक्तीकक्ष स्थापन करण्यात येणार आहे. त्यात दोन महिला पोलिस अंमलदार यांची नेमणूक करण्यात येणार आहे. यात महिला, मुली, बालके यांना भयमुक्त वातावरण देऊन त्यांना विश्वासात घेवुन त्यांचे अडचणींचे निराकरण करणे तसेच समुपदेशन होईल.
शक्तीनजर : सामज माध्यम म्हणजेच व्हॉट्सअॅप स्टेटस, फेसबुक पोस्ट, इंस्टाग्राम यावर अल्पवयीन किंवा किशोरवयीन मुले- मुली अथवा इतर व्यक्ती शस्त्र, बंदूक, पिस्तूल, चाकू अथवा इतर धारदार व घातक हत्यारांसोबतचे फोटो टाकतात. त्यावर सदर पथकाची नजर असणार असून असे प्रकार आढळून आल्यास तत्काळ कडक कारवाई केली जाणार आहे.
शक्तीभेट : शाळा, महाविद्यालये, सर्व सरकारी कार्यालये, खासगी कंपन्या, रुग्णालये, बसस्थानक, कोचिंग क्लासेस, महिला वसतिगृह येथे भेटी देत महिलांचे प्रबोधन करत त्यांचे लैंगिक, शारीरिक तसेच मानसिक छळापासून संरक्षण होईल, अशा उपाययोजना केल्या जाणार आहेत.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Pune Solapur flight: पुण्याहून सोलापूर आता ४० मिनिटांत पोहोचणे शक्य होणार; १ मेपासून स्टार एअरची विमानसेवा, नवीन स्लॉट मंजूर!

आवडत्या क्रिकेटपटूविरोधात डॉ. आंबेडकरांनी लढवली होती निवडणूक, हा प्रसंग एकदा वाचाच...

Kolhapur Danoli Crime : कोल्हापुरातील दानोळीमध्ये अपहरण करून खून, २५ लाखांची मागणी, भरतेशचा कारण नसताना बळी, घटनास्थळी आमदार यड्रावकर दाखल

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

SCROLL FOR NEXT