पुणे

‘जनाई शिरसाई’साठी आंदोलनाचा इशारा

CD

बारामती, ता. ५ : जनाई शिरसाई उपसा जलसिंचन योजनेबाबत राज्य शासनाने आम्हाला फसवले असून मुंबईत बैठक घेऊन लेखी आश्वासन देऊनही अद्याप कोणतीही कार्यवाही होत नाही, त्या मुळे आता गावोगावी फिरून तीव्र आंदोलन करण्यासाठी पुढील दिशा ठरवली जाणार असल्याची माहिती जनाई शिरसाई उपसा योजनेच्या शेतकरी कृती समितीने दिली.

बारामतीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत पोपटराव खैरे, ज्ञानेश्वर कौले, महेश गायकवाड, विलासराव खैरे, भानुदार बोरकर, सचिन साळुंके, राजाभाऊ बोरकर, राजेंद्र मचाले, दिलीप खोमणे, संपत कुतवळ, श्रीकांत खैरे, भाऊसाहेब मोरे आदींनी तीव्र आंदोलनाचा इशारा दिला.

कृती समितीने पत्रकार परिषदेत सांगितले, की ५७ कोटींची योजना ४०० कोटींवर गेली आहे. अजूनही त्याचा शेतकऱ्यांना लाभ मिळत नाही. उपोषणानंतर लेखी आश्वासन देऊनही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शब्द पाळलेला नाही. त्यामुळे आचारसंहितेच्या आत ते हा प्रश्न मार्गी लावतील, अशी अपेक्षा कृती समितीच्या वतीने व्यक्त केली आहे.
दरम्यान, कार्यक्षेत्रातील प्रत्येक गावात जाऊन लाभधारकांच्या बैठका घेणार असल्याचे सदस्यांनी जाहीर केले. लोकभावना तीव्र असून प्रसंगी आम्ही योग्य तो निर्णय निश्चित घेऊ असेही त्यांनी पत्रकार परिषदेत नमूद केले.

कृती समितीच्या या आहेत मागण्या
हक्काचे पाणी मिळावे, वार्षिक नियोजन करून द्यावे
मुख्य कालवा बंद पाइपमधून व्हावा, त्याची माहिती मिळावी
कालव्यामध्ये शेतकऱ्यांच्या गेलेल्या जमिनीचा मोबदला मिळावा
योजनेचे वीजबिल कायमस्वरुपी शासनाने भरावे
पाणी वापर संस्था अद्ययावत करून देत त्या वाढ व्हावी
टप्पा दोन व तीन मधील सर्व तलाव योजनेत समाविष्ट करावेत
मायनर सहा मधील अपूर्ण काम पूर्ण करावीत
राखीव कोटा वगळता ओव्हरफ्लोचे पाणी मिळावे
योजनेचे शाखा कार्यालय सुपे येथे व्हावे
हा प्रकल्प सौरउर्जेवर चालवावा
खडकवासला यांत्रिकी व जनाई उपसा प्रकल्पाचे एकत्र व्यवस्थापन व्हावे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

लाडक्या बहिणींसाठी खुशखबर! एप्रिलमध्ये ‘या’ महिलांनाच मिळणार ३००० रुपये, ‘ई-केवायसी’ न केलेल्या महिलांचा बंद होणार लाभ, वाचा...

उज्ज्वला योजनेच्या महिलांच्या डोळ्यात धूर! ऑनलाइन बुकिंगसाठी ४५ दिवसांची अट; अन्नपूर्णा योजनेचा शासन निर्णय, पण अंमलबजावणी कागदावरच, वाचा...

Paneer Jowar Paratha: उन्हाळ्यात हलका पण पौष्टिक नाश्ता हवा असेल तर घरच्या घरी बनवा स्वादिष्ट पनीर ज्वारी पराठा

अग्रलेख : भारत- चीन व्यापाराचा नवा अध्याय

Weekly Rashi Bhavishya Horoscope News in Marathi : कसा असेल तुमचा आठवडा..? ग्रहमान : १४ मार्च २०२६ ते २० मार्च २०२६ - मराठी राशी भविष्य

SCROLL FOR NEXT