बारामती, ता. ३ : येथे ज्येष्ठ स्वातंत्र्य सैनिक (स्व.) डॉ. वर्धमान कोठारी जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधत मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत डॉ. उज्वला कोठारी व शेखर कोठारी यांनी माहिती दिली.
७ ते १५ डिसेंबर यादरम्यान बहिरेपणा, स्त्रीरोग, वंध्यत्व समस्या, सांधेदुखी, वातविकार, दमा, अस्थमा, मूळव्याध, हृदयरोग, मधुमेह, उच्च रक्तदाब, थायरॉईड, पक्षघात, छातीचे आजार, त्वचारोग, स्थूलता अशा आजारांनी ग्रस्त असलेल्या रुग्णांची तपासणी होणार आहे.
ऑडिओलॉजिस्ट डॉ. रविशंकर नवले, डॉ. उज्वला कोठारी, डॉ. संतोष शहा, हृदयविकार तज्ज्ञ डॉ. राजीव खरे, डॉ. केतन अंबर्डेकर, डॉ. अंजली सोरटे, बालरोगतज्ज्ञ डॉ. अनुप दोभाडा, डॉ. आनंद गवसणे, त्वचारोग तज्ज्ञ डॉ. मीनल गवसणे, डॉ. सलोनी चंकेश्वरा या शिबिरात तपासणी, उपचार व मार्गदर्शन करणार आहेत. सकाळी अकरा ते दुपारी एक व संध्याकाळी सहा ते रात्री नऊ वाजेपर्यंत वेळ घेऊन तपासणीसाठी येण्याचे आवाहन केले आहे. अधिक माहिती व नावनोंदणीसाठी ९२२५५ ३६३९२ क्रमांकावर संपर्क साधावा.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.