बारामती, ता. ११ : येथील बारामती कोचिंग असोसिएशनने आयोजित केलेल्या इंटर अॅकॅडमी क्रिकेट स्पर्धेत सुयश सायन्स अॅकॅडमीने प्रथम क्रमांक प्राप्त केला.
एक्सलन्स सायन्स अॅकॅडमी उपविजेती ठरली. राज पॅटर्न तिसऱ्या क्रमांकावर राहिले. बारामतीतील कोचिंग क्लासेसने एकत्रित येत बारामती कोचिंग असोसिएशनची स्थापना केली आहे. या संघटनेमार्फत बारामतीतील कोचिंग क्लासेसच्या क्रिकेट टीममध्ये ही स्पर्धा झाली.
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्टेडियम येथे झालेल्या या स्पर्धेला विद्यार्थ्यांनी मोठा प्रतिसाद दिला. या स्पर्धेत इंजिनिअर किंवा डॉक्टर होण्यासाठी द्याव्या लागणाऱ्या स्पर्धा परीक्षांचे प्रशिक्षण बारामतीतील कोचिंग क्लासेस देत असतात. मुलांचा मानसिक ताण कमी करण्यासाठी अशा स्पर्धांचे आयोजन असोसिएशन कडून करण्यात येते.
स्पर्धेचे नियोजन गौरव गुंदेचा आणि रणजित कर्चे यांनी केले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.