बारामती, ता. ११ : ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्याविरुद्ध महायुतीचे घटक असलेले आमदार गोपीचंद पडळकर व सदाभाऊ खोत हे चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करतात, याबद्दल महायुतीतील राष्ट्रवादीने आक्षेप घ्यायला पाहिजे. शरद पवार यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यावर सातत्याने बोलत राहणे ही बाब योग्य नाही, महायुतीतील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष याबाबत काही बोलत नाही, हे आश्चर्यकारक असल्याचे प्रतिपादन विद्या प्रतिष्ठानचे खजिनदार युगेंद्र पवार यांनी पत्रकार परिषदेत केले.
युगेंद्र पवार म्हणाले, ‘‘केवळ शरद पवारच नाही, तर कोणत्याही ज्येष्ठ व्यक्तीविषयी चुकीच्या पद्धतीने वक्तव्य करणे हे आपल्या संस्कृतीत न बसणारे आहे. पडळकर व खोत यांच्या वक्तव्याबद्दल राष्ट्रवादी काँग्रेस त्यांना काहीच जाब विचारत नाही, ही बाब आश्चर्यजनक आहे.’’
आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने स्वच्छ प्रतिमेच्या युवक व युवतींच्या नवीन चेहऱ्यांना संधी देण्याचे पवार यांनी नमूद केले. कार्यकर्त्यांच्या पाठीशी ताकद उभी करावी लागेल असे ते म्हणाले.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.