बारामती, ता. १८ : खासदार सुप्रिया सुळे यांनी बारामतीत सोमवारी (ता. १७) उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर यांच्याशी उपविभागीय कार्यालयात भेट घेऊन विविध प्रश्नांसंदर्भात चर्चा केली.
यावेळी बारामती आणि इंदापूर तालुक्यातील विविध विषयांवर चर्चा केली. पालखी मार्गाचे निकृष्ट पद्धतीचे काम, तरडोली येथील पाणी आणि एसटीचा प्रश्न, संजय गांधी निराधार योजनेचे दोन महिने रखडलेले पैसे, खंडोबाचीवाडी, निंबूत छपरी, घुमट वस्ती येथील रस्त्याची समस्या, बारामती-इंदापूर बस सेवेत येणाऱ्या अडचणी याविषयावर सविस्तर चर्चा करण्यात आली.
यावेळी सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल प्रांताधिकाऱ्यांचे सुळे यांनी आभार मानले. बैठकीत ठरल्यानुसार रेल्वेच्या अडचणीसंदर्भात गुरुवारी (ता. २०) पुणे डीआरएम यांच्यासोबत बैठक आयोजित केली आहे. त्याचबरोबर एसटीच्या अडचणीसंदर्भात पुणे येथे विभागीय नियंत्रकांसोबत २६ फेब्रुवारीला बैठकीचे आयोजन केल्याची माहिती सुळे यांनी दिली. या बैठकीत झालेल्या विषयांचा आढावा घेण्यासाठी पुढील महिन्यात १७ मार्चला बैठकीचे आयोजन केले आहे. याप्रसंगी महाविकास आघाडीचे पदाधिकारी उपस्थित होते.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.