पुणे

बारामती रेल्वे स्थानकावरील पोलिस चौकी बंदचा निर्णय

CD

बारामती, ता. १९ : एकीकडे विकसित शहर म्हणून ओळख असलेल्या बारामती रेल्वे स्थानकाची पोलिस चौकीच बंद करण्याचा निर्णय रेल्वे विभागाने घेतला आहे. याची तातडीने अंमलबजावणी देखील केली आहे. बारामतीची पोलिस चौकी दौंड पोलिस ठाण्यात विलीन करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या पुढील काळात दौंडवरून दोन रेल्वे पोलिस बारामतीला येऊन बारामतीच्या रेल्वे स्थानकावर चोवीस तास सेवा देणार असल्याची माहिती आहे.
वास्तविक बारामती- दौंड- बारामती हा रेल्वे प्रवास नाममात्र दरात होत असल्याने त्याचा वापर विद्यार्थी व आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील लोक मोठ्या संख्येने करतात. या पार्श्वभूमीवर रेल्वे स्थानक व रेल्वे प्रवासात देखील प्रवाशांची सुरक्षितता हा मुद्दा महत्त्वाचा आहे. असे असतानाही बारामती रेल्वे स्थानकावरील चौकीच बंद करण्याचा अजब निर्णय रेल्वे मंत्रालयाने घेतला.
बारामतीला या पूर्वी एक पोलिस उपनिरिक्षक, एक सहायक फौजदार, दोन हवालदार व दोन कर्मचारी, अशी सहा जणांची टीम कार्यरत होती. येथील चौकीही कार्यरत असायची. आता एक फतवा काढून अचानकच फक्त दोनच पोलिस कर्मचाऱ्यांवर बारामती रेल्वे स्थानकाची चोवीस तासांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
दरम्यान, कालच (मंगळवार) शिर्सुफळ ते दौंड दरम्यान एका प्रवाशाला चार जणांनी चाकूचा धाक दाखवीत लुटल्याची घटना घडली आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस बंदोबस्त वाढविण्याऐवजी तो कमी करण्यात आला, याचे आश्चर्य व्यक्त होत आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Bihar CM: बिहारचा नवा मुख्यमंत्री ठरला! 'या' नावावर शिक्कामोर्तब, अधिकृत घोषणा संध्याकाळी

Ayushman Bharat Scheme Update: आयुष्मान भारत योजनेत मोठा बदल! मोदी सरकारमुळे मिळणार ₹10 लाखांपर्यंत मोफत उपचार

IPL 2026: 'भारतात यशस्वी ठरलेल्या लोकांकडून शिकतोय अन् नोट्स घेतोय...' पंजाबच्या मॅचविनरने उघड केलं यशाचं गुपित

Maoist Song Dance Pune: पुण्यातील वसतिगृहात माओवादी आशय असलेल्या गाण्यावर नृत्य; Video Viral

SBI Whatsapp : स्टेट बँकेत अकाऊंट आहे? तुमच्यासाठी मोठी खुशखबर; घरबसल्या व्हॉट्सॲपवर होणार सगळं काम, पाहा काय आहे नवी सुविधा

SCROLL FOR NEXT